ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान 'बिग बॉस १६' फेम अभिनेत्याने घेतली अलिशान कार, किंमत वाचून डोळे विस्फारतील
‘उडारियां’ आणि ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेता अंकित गुप्ता गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरात त्याचं नाव प्रियंका चहरसोबत जोडलं गेलं होतं. दोघांना एकत्र बघायला प्रेक्षकांना खूप आवडायचं. पण गेल्या काही महिन्यांपासून अंकित- प्रियंकाच्या ब्रेकअपची चर्चा रंगल्या आहेत. शिवाय, दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केलं आहे. त्यामुळेच अंकित- प्रियांकाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच अंकित गुप्ताने नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुपरस्टार अंकुश चौधरी बनला गायक, ‘पी.एस.आय. अर्जुन’मधील Promotion song तुम्ही ऐकलंत का ?
काही तासांपूर्वीच अभिनेता अंकित गुप्ताने इन्स्टाग्रामवर नव्या अलिशान कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर व्हाईट कलरची रेंज रोव्हरबरोबरचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये गाडीची पूजा करताना दिसत आहे, त्यानंतर अंकित आपल्या अलिशान कारला किस करताना दिसत आहे. यावेळी अंकित पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स अशा लूकमध्ये पाहायला मिळाला. कारसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्याने कॅप्शन दिलं की, “तुझं घरी स्वागत आहे. मला इथंपर्यंत पोहोचवल्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसंच माझे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो.”
‘पंचायत’नंतर आता ‘ग्राम चिकित्सालय’ हटके वेबसीरिज येतेय, कधी आणि कुठे रिलीज होणार ?
अंकित गुप्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर टीना दत्ता, गौतम वीज, सचेत टंडन, राजीव अदातिया, अभिषेक कुमार, करण ग्रोवरसह बऱ्याच टेलिव्हिजन कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पण अद्याप प्रियांका चाहरने अंकितला शुभेच्छा दिलेली नाही. अंकित गुप्ताच्या आलिशान कारबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याच्या रेंज रोव्हरची किमत जवळपास २.४ कोटीच्या आसपास आहे. यापूर्वी समर्थ जुरेलने या रेंज रोव्हर कारची खरेदी केली होती. अंकित शेवटचा ‘माटी से बंधी डोर’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ही मालिका फेब्रुवारीमध्ये बंद झाली. मालिकेमध्ये अंकितने मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेसोबत एकत्र स्क्रिन शेअर केली होती. ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत ऋतुजा बागवेसह अनेक मराठी कलाकार पाहायला मिळाले होते.