अनुराग कश्यप येणार बिग बॉस 18 मध्ये
बिग बॉस 18, सलमान खानने होस्ट केलेला शो जसजसा पुढे जात आहे तसतसा रोमांचक होत आहे. हा शो टीआरपीच्या यादीत शीर्षस्थानी आणण्यासाठी निर्मातेही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत निर्मात्यांनी टीआरपीसाठी अनेक स्टार्सची वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. याशिवाय काही स्टार्सनाही खास पाहुणे म्हणून आणण्यात आले आहे.
दरम्यान आता चित्रपट निर्माता अनुराग कश्यप लवकरच बिग बॉस 18 मध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत अनुराग कश्यपच्या एंट्रीने शोमध्ये मोठा ट्विस्ट येणार हे निश्चित आहे. अनुराग कश्यप या शो मध्ये येऊन नक्की काय करणार आहे याची उत्सुकता आता चाहत्यांनाही लागली आहे, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – Instagram)
Bigg Boss 18 च्या या दबंग अभिनेत्रीची जिंकण्याची शक्यता? प्रेक्षकांच्या मनात केली जागा
अनुरागची पाहुणा म्हणून एंट्री
बिग बॉस 18 च्या संदर्भात बातम्या येत आहेत की चित्रपट निर्माता अनुराग कश्यप शोमध्ये प्रवेश करणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की ‘अनुराग’ बिग बॉस 18 च्या घरात पाहुणे म्हणून प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते कुटुंबीयांना कठोर धडा देताना दिसणार असल्याची आता चर्चा रंगली आहे. अनुराग कश्यपच्या आधी अश्नीर ग्रोवर, हिना खानसह इतर स्टार्सने या शोमध्ये पाहुणे म्हणून प्रवेश केला आणि सध्याच्या स्पर्धकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. आगामी वीकेंडचे युद्ध पाहणे खूप मनोरंजक ठरणार आहे आणि अनुराग कश्यप आपल्या स्टाईलने कसे स्पर्धकांना धारेवर धरणार की त्यांना काही वेगळ्या गोष्टी समजावणार हेदेखील पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
6 जण नॉमिनेशन्समध्ये
दरम्यान, सध्याच्या या 9 व्या आठवड्यात घरातून बाहेर काढण्यासाठी 6 स्पर्धकांना नामांकन देण्यात आले आहे. या यादीत सर्वांचा सध्याचा आवडता स्पर्धक करण वीर मेहरा, दिग्विजय राठी, सारा अरफीन खान, चुम दरंग, कशिश कपूर आणि शिल्पा शिरोडकर यांच्या नावांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात कोणाला घरातून बेदखल केले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शिल्पा शिरोडकरला झाला पश्चाताप? करण वीर मेहराच्या धारदार शब्दांनी अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी!
अनुरागचा दृष्टीकोन महत्त्वाचा
शो च्या जवळच्या एका स्रोताने खुलासा केला की, “कश्यप स्पर्धकांना त्याचा ट्रेडमार्क असणाऱ्या स्पष्टपणाची नक्कीच जाणीव करून देईल आणि त्याचा दृष्टीकोन नक्कीच घरातील स्पर्धकांना विचार करायला भाग पाडेल. जे आपल्या मनात आहे ते बोलण्यापासून कधीही अनुराग हटला नाही आणि बिग बॉसमध्येही तो हेच करेल. इतकंच काय तर स्पर्धकांनी त्याच्या कडवट सत्यासाठी तयार राहावे.” असेही यावेळी सांगण्यात आले आहे. त्याच्या सडेतोड बोलण्याच्या पद्धतीने कश्यपने स्पर्धकांच्या रणनीती, वर्तन आणि परस्परसंवादावर भाष्य करणे अपेक्षित आहे आणि त्यामुळेच आता अनुराग कोणाला काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण अनुरागचा आवडता स्पर्धक नक्की कोण असेल हेदेखील सर्वांना जाणून घ्यायचे आहे.