बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन कुनिका सदानंद (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ च्या घरातील सदस्यांना त्यांचा पहिला कॅप्टन मिळाला. घराचा पहिला कॅप्टन बनण्याचे दावेदार अभिषेक बजाज, अशनूर कौर आणि कुनिका सदानंद होते. घराची जबाबदारी घेण्यासाठी तिघांमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळाली. त्यांना टाइल्स तोडण्याचे काम सोपवण्यात आले होते. बसीर अलीने प्रतिनिधी म्हणून कुनिकासाठी काम केले तर संचालकाची जबाबदारी तान्या मित्तलने पार पाडली.
घराची जबाबदारी घेण्यासाठी अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांच्यात स्पर्धा सुरू झाली. कॅप्टन बनण्याची शर्यत सुरू होताच, झीशान कादरी प्रथम कुनिका सदानंदच्या टाइल्स तोडतो. आता झीशानने कुनिकाच्या टाइल्स तोडताच, ती रागावली आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. तान्या मित्तल कुनिकाला कॅप्टन बनवते
लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणार तान्या मित्तल, हे ऐकून मृदुल म्हणाला ‘आता मला तुझ्याशीच करायचे’
तान्याने बसीरला विजेता घोषित केले
कार्य संपल्यानंतर, तान्या मित्तल बसीर अलीला विजेता घोषित केल्यामुळे कुनिकाला कॅप्टनपदाची जबाबदारी मिळाली. घराची कॅप्टन होताच, कुनिका तिच्या मित्रांसोबत – बसीर अली, तान्या मित्तल आणि नीलम गिरी – सर्व घरातील सदस्यांना काम वाटून देते. कुनिका गौरव खन्नाला दुपारचे जेवण आणि नाश्ता बनवण्याची जबाबदारी सोपवली असून झीशान कादरीला भांडी धुण्याचे काम दिले. कुनिकाने कॅप्टन्सी स्वीकारून सर्वांना योग्य काम वाटून दिल्याचे दिसून आले आहे
झीशानने दिला नकार
काम मिळताच झीशान कादरी रागावतो आणि तो बशीर अलीला स्पष्टपणे सांगतो की तो भांडी धुणार नाही. गौरव म्हणतो की त्याला स्वयंपाक कसा करायचा हे येत नाही आणि तो अन्न शिजवू शकणार नाही, ज्यावर कुनिका म्हणते की तो भांडी धुवू शकतो का? यानंतर कामे बदलली जातात आणि शेवटी झीशानला बाथरूम धुण्याचे काम दिले जाते आणि अभिषेकला भांडी साफ करण्याची जबाबदारी दिली जाते.
फरहाना-बशीर भांडण
दुसरीकडे, गौरव खन्नामुळे फरहाना सिक्रेट रूममधून घरी परत आली आणि आल्या आल्या तिने बसीरबरोबर भांडण केले. बशीर आणि फरहानामध्ये खूप वाद झाल्यामुळे घरातील वातावरण पूर्ण बिघडले आहे. दुसरीकडे, तान्या मित्तलला घरकाम करण्यात अडचण येते. ती कॅमेऱ्यासमोर येते आणि घरकाम केल्याने तिचे मऊ हात खराब होत आहेत असे म्हणत नखरे करत असल्याचे प्रोमोमध्येही दिसले होते. त्यामुळे आता आज ‘विकेंड का वार’मध्ये सलमान नक्की कोणाकोणाला ओरडणार आणि कोणाची स्तुती करणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.