फोटो सौजन्य - सोशल मिडिया (JioHotstar Reality)
मागील आठवड्यामध्ये सुरू झालेला बिग बॉस 19 मध्ये अनेक मोठे चेहरे पाहायला मिळाले. ज्या स्पर्धकांकडून चाहत्यांना मोठ्या पेक्षा होत्या ते स्पर्धक मागील दोन आठवडे मध्ये फार काही चांगले मनोरंजन करू शकले नाही. मागील आठवड्यामध्ये सलमान खानने स्पर्धकांना चांगला शब्दामध्ये सल्ले दिले होते पण या आठवड्यामध्ये सलमान खान आत्ता घरातल्या स्पर्धकांवर संतापलेला पाहायला मिळाला. या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खान या आठवड्यातील सर्व मुद्द्यांचा हिशोब घेताना दिसणार आहे.
टेलिव्हिजनच्या वादग्रस्त रियालिटी शोमध्ये टीव्हीवरचा प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्नाची खूप हटके एंट्री करण्यात आली होती. टीव्हीच्या सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये ‘अनुपमा’ फेम अभिनेत्याला पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून असे दिसते की गौरव सुरक्षित बाजू साकारण्याचा प्रयत्न करत आहे. आज शनिवार सहा सप्टेंबर रोजी सलमान खान विकेंच्या वारला घरातल्या सदस्यांशी बोलणार आहे यावेळी तो गौरव खन्नाची त्याचबरोबर घरातल्या इतर सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे.
BIGG BOSS 19: सलमान खान आज कोणाला खडसावणार? अमान मालिकची घेणारा शाळा…
बिग बॉसशी संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या प्लॅटफॉर्म ‘बिग बॉस ताजा खबर’ ने त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वीकेंड का वार’ मध्ये सलमान खानने गौरव खन्नावर टीका केली आणि त्याला निष्क्रिय स्पर्धक म्हटले. यावेळी सलमान खानने त्याला सांगितले की जर तू घराचं लीडर आहेस तर घरातल्या प्रत्येक भांडणांमध्ये तुझे मत कुठे आहे.
गौरव खन्ना यांना फटकारल्यानंतर, त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांचे समर्थन करताना दिसले. एका फॉलोअरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “जर गौरव निष्क्रिय स्पर्धक असेल तर नगमा आणि आवेज अस्तित्वातच नाहीत.” दुसऱ्याने लिहिले की, “जर गौरव निष्क्रिय असेल तर नगमाला स्पर्धक म्हणून गणले जाऊ नये.” एका व्यक्तीने लिहिले की, “हे काय आहे, जर कोणी व्यर्थ लढत नसेल तर तो निष्क्रिय स्पर्धक बनतो.” गौरव खन्नाच्या समर्थनार्थ अशाच अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
Bigg Boss 19 Promo : आता अशनूरची सटकली…नेहलच्या आरोपांना लावलं फेटाळून! मित्रासाठी राहिली खंभीर उभी
आजच्या आगामी एपिसोड मध्ये सलमान खान गौरव खन्नाचा व्यतिरिक्त अशनूर कौर, नगमा मिराजकर आणि अमाल मलिक यांना देखील फटकारताना दिसणार आहे. बिग बॉस 19 या दुसऱ्या विकेंडच्या वार मध्ये जे स्पर्धक घरामध्ये काहीच करत नाही त्यांना आज सलमान सुनावणार आहे. सलमान खानने त्या सर्वांना कॉफी ऑफर केली आणि सांगितले की ते नेहमीच झोपत असतात आणि शोमध्ये शून्य कंटेंट देत असतात. सलमानने सर्वांना बसून कॉफी पिताना वीकेंड का वारचा आनंद घेण्यास सांगितले.