फोटो सौजन्य - सोशल मिडिया (JioHotstar Reality)
Bigg Boss 19 New Promo Update : टेलिव्हिजनवर चर्चेत असलेला शो बिग बॉस 19 सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. कर्णधार पदाच्या उमेदवारीमध्ये उभे असलेले दोन स्पर्धक बसीर अली आणि अभिषेक बजाज यांच्यात लढत झाली. या लढाईमध्ये बसीर अली जिंकला आणि घराचा नवा कर्णधार म्हणून त्याला बनवण्यात आले आहे. या टास्कदरम्यान अभिषेक बजाज याने फरहाना भट्ट हिला उचलून दुसरीकडे ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावरुन टास्कदरम्यान तो मुद्दा उचलला नाही.
टास्क झाल्यानंतर आता हा मुद्दा घरामध्ये चर्चेचा विषय झाला आहे, यामध्ये फरहाना साथ देणारी नेहल आणि अभिषेकला साथ देणारी अशनूर या दोघींमध्ये कडाक्याचा वाद पाहायला आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. कलर्स टीव्हीने सोशल मिडियावर एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये अभिषेक बजाज याला साथ देण्यासाठी अशनूर खंभीर उभी दिसली आहे.
कलर्स टीव्ही शेअर केलेला प्रोमो मध्ये सुरुवातीलाच अशनूर की नेहलला म्हणते की ज्याप्रकारे तू बोलली आहेस ते अजिबात मला आवडलेले नाही. यावर नेहल म्हणते की मी तुला तुझेच उदाहरण देत होती. तू माझ्या वैयक्तिक जीवनावर टिप्पणी करू शकत नाही असे अशनूर म्हणाली. या दोघींमध्ये हा वाद फारच वाढला आणि त्यानंतर दोघींमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला.
Captaincy task ke baad ghar mein macha hungama, kya hoga aage koi naya drama? 😰
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par.
Watch Now: https://t.co/wpGGfH01bl #BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/tpo3gACqO0
— JioHotstar Reality (@HotstarReality) September 5, 2025
बिग बाॅस 19 चा नवा कर्णधार हा बसीर अली झाला आहे, त्याने अभिषेक बजाजला पराभूत करुन त्याने कर्णधारपद जिंकले आहे. कालच्या भागामध्ये ड्रामा पाहायला मिळाला, या भागात गौरव खन्ना आणि कुनिका सदानंद यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याचबरोबर कुनिका आणि तान्या या दोघींमध्ये भांडण झाले होते.
काल झालेल्या टास्कमध्ये मृदुल तिवारीच्या ओठांना दुखापत झाली आहे. कालचा एपिसोड पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनी त्यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. बिग बॉसच्या घरात नेहमीच काहीतरी घडत राहते, जे चर्चेत येते हे लक्षात घेण्यासारखे आहे. शोमधील टास्क दरम्यान अशा गोष्टी अनेकदा येत राहतात. आता बिग बॉस १९ च्या नवीनतम भागात काय होईल हे पाहायचे आहे? आणि सलमान खान ‘वीकेंड का वार’ मध्ये हा मुद्दा उपस्थित करेल की नाही?