तान्या - कुनिकाच्या मैत्रीत वादाची ठिणगी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
संपूर्ण देशातील लोक टीव्ही जगतातील ‘बिग बॉस १९’ या रियालिटी शोचा आनंद घेत आहेत, जो प्रत्येक घरात आवडतो. सलमान खानची खरडपट्टी आणि घरातला तमाशा, जनता त्याचा एकही एपिसोड चुकवत नाहीये. यावेळी ‘बिग बॉस १९’ ला गेल्या सीझनपेक्षा जास्त प्रेम मिळत असल्याचे दिसून आले. आजच्या एपिसोडमध्ये तान्या मित्तल आणि कुनिका सदानंद यांच्यात जोरदार लढाई होणार आहे. अशा परिस्थितीत, तान्या आता कुनिका सदानंद तसेच नीलम गिरीपासून दूर राहू लागली आहे, ज्याची एक झलक प्रोमोमध्ये निर्मात्यांनी शेअर केली आहे.
‘बिग बॉस १९’ च्या प्रोमोमध्ये, तान्या मित्तल कोणाचेही नाव न घेता म्हणत असल्याचे दिसून आले, ‘मित्र तो असतो जो कोणतीही संधी न पाहता त्याला एकटे सोडत नाही. तिथे तुम्ही सुरक्षित खेळत आहात की मला त्यांच्याशी भांडायचे नाही. मला समजतंय की हा गट तुटेल किंवा हे दोघे माझ्याविरुद्ध होतील. मला एकटे बसावे लागेल, एवढेच होईल, पण खेळ संपणार नाही.’ यादरम्यान, झीशान कादरी तान्या मित्तलशी सहमत होताना दिसला. या प्रोमोवरून तान्या नीलम गिरी आणि कुनिका सदानंद यांच्याशी असलेली मैत्री संपवणार आहे असं दिसून येत आहे.
प्रोमोमध्ये मेकर्सने म्हटले की, ‘तान्याला मैत्रीत आलाय एकटेपणा, आपल्या नात्यांसह कसे करणार ती डील’. दरम्यान या आठवड्यात घरातून बाहेर होण्याच्या प्रक्रियेत आवेझ दरबार, नगमा मिराजकर, मृदुल तिवारी आणि नतालिया जानोसजेक हे चार स्पर्धक निवडले गेले आहेत. चाहत्यांच्या मते या आठवड्यात कदाचित डबल एलिमिनेश होऊ शकते. दोन दिवसांपूर्वीच शहनाझ गिलचा भाऊ शाहबाज बदेशाचा वाईल्डकार्ड स्वरूपात प्रवेश झाला आहे.
एका टास्कदरम्यान कुनिकाच्या शब्दांमुळे आणि आईचे नाव घेतल्यामुळे तान्या मित्तल प्रचंड दुखावली गेली आहे आणि तिने या गोष्टीमुळे आता कुनिका आणि नीलमशी मैत्री तोडण्याचे निश्चित केले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच कुनिका आणि तान्या या दोघींंमध्ये धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. तसंच तान्यादेखीन कुनिकाला टोमणे मारत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे १५ दिवसातच हा बाँड तुटणार असल्याचे चाहत्याना दिसून येणार आहे.
बिग बॉस १९ सुरू होऊन केवळ १५ दिवस झाले आहेत. मात्र या पंधरवड्यात प्रत्येकाची समीकरणं बदलताना दिसून येत आहेत. अजूनही एक ग्रुप असा तयार झालेला नाही. मात्र तरीही एक ग्रुप तयार होईपर्यंत तो फुटताना दिसत आहे. अजूनही कोणीही कोणाशीही Alliance केल्याचे दिसून येत नाहीये. मात्र आता कुनिका, निलम आणि तान्याचा ग्रुप फुटणार हे समोर येतंय.
‘सलमान खान गुंड आहे आणि…’, भाईजानबद्दल ‘दबंग’ दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, नेमकं काय आहे प्रकरण?