फोटो सौजन्य - JioHotstar Reality
Bigg Boss 19 Update : सलमानचा वादग्रस्त शो बिग बॉस 19 ला सुरुवात झाली आहे. प्रीमियरच्या दिवशी फॅन्स का फेसला यामध्ये शेहबाज बदेशा याला स्टेजवरूनच शोमधून बाहेर काढण्यात आले होते. आता आणखी एक स्पर्धा बिग बॉसच्या घरातून बाहेर झाला आहे. बिसने मागील काही सिझनमध्ये सीक्रेट रूम ठेवला नव्हता त्यामुळे प्रेक्षकांची सीक्रेट रूमची मागणी केली होती. आता या नव्या सिझनमध्ये बिग बाॅसने सीक्रेट रूमची योजना आखली आहे, त्यामुळे बिग बाॅसच्या घरामध्ये आणखी मसाला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या घरामधून असलेल्या स्पर्धकांनी त्याच्या वोटींगने फरहाना भट हिला घराबाहेर काढून टाकले आहे. त्यानंतर बिग बॉस ने तिला सिक्रेट रूममध्ये ठेवले आहे. शो बिग बॉस १९ मध्ये आधीच खूप गोंधळ उडाला आहे. स्पर्धकांमधील भांडणांपासून ते नामांकनापर्यंत सर्व काही घरात दिसून आले. बिग बॉसने स्पर्धकांसाठी गुप्त खोल्या देखील उघडल्या आहेत. बिग बॉस १९ च्या आगामी भागात नाॅमिनेशन टास्क पाहायला मिळणार आहे. या टास्कमध्ये ७ स्पर्धकांना नाॅमिनेशन देण्यात आले आहे. या यादीत कोणत्या सदस्यांची नावे समाविष्ट आहेत हे देखील आपण सांगूया?
बिग बॉसच्या फॅन पेज ‘द खबरी’ नुसार, आगामी भागात पहिल्या आठवड्यात ७ स्पर्धकांवर नामांकनाची तलवार टांगली गेली आहे.कालच्या भागानंतर दाखवण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आता या आठवड्यामध्ये प्रवास संपु शकतो. नामांकित स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर, नीलम गिरी, तान्या मित्तल, नतालिया जानोझेक, प्रणित मोरे, अभिषेक बजाज, गौरव खन्ना आणि झीशान कादरी यांची नावे आहेत.
आदल्या दिवशी, बिग बॉसने स्पर्धकांसाठी असेंब्ली रूम उघडला. त्यानंतर बिग बॉसने त्यांची युक्ती वापरली आणि स्पर्धकांना असा एक सदस्य निवडण्यास सांगितले जो स्पर्धक घरात राहण्यास पात्र नसतील. घरातील सदस्यांनी परस्पर संमतीने फरहाना भट्टचे नाव घेतले आणि फरहानाला घरातून बाहेर काढण्यात आले. तथापि, बिग बॉसने फरहानाला बाहेर काढले नाही आणि तिला गुप्त खोलीत पाठवले. आता फरहानाला गुप्त खोलीतूनच घरातील सदस्यांबद्दल सर्व काही लक्षात येत आहे.
Nominated Contestants for Week 1 #NeelamGiri#TanyaMittal #NataliaJanoszek #PranitMore#AbhishekBajaj
#GauravKhanna #ZeeshanQadri— The Khabri (@TheKhabriTweets) August 25, 2025
फरहाना भट्टला सिक्रेट रूममध्ये पाठवल्यानंतर, बिग बॉसने असेही म्हटले की येत्या काळात तिला एक विशेष शक्ती दिली जाऊ शकते. आता, सर्व घरातील सदस्यांनी मिळून फरहानाला बाहेर काढले असताना, बिग बॉसने एक युक्ती खेळली आणि फरहानाला वाचवले आणि तिला एक विशेष शक्ती देण्याची घोषणाही केली. शोच्या पहिल्याच दिवशी कुनिका सदानंद आणि बसीर अली यांच्यात जोरदार वाद झाला.