फोटो सौजन्य - सोशल मिडिया
टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिेअॅलिटी शो बिग बाॅस 19 चा काल शुभारंभ झाला आहे. या नव्या सीझनमध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहे. अनेक वेगवेगळ्या राज्यांमधून बिग बॉस ने स्पर्धकांची निवड केली आहे. कालपासून बिग बाॅसच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता बिग बाॅसच्या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नजर असणार आहे. बिग बाॅसचे प्रेक्षक हे हा शो मागील अनेक वर्ष पाहत आहेत. अनेक वादामध्ये असलेल्या स्पर्धेकांना या शोचा भाग बनवण्यात येते. त्याचबरोबर त्यांनी भूतकाळामध्ये केलेल्या कृत्याचा देखील शोमध्ये हिशोब घेतला जातो.
काही युट्युबवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व या शो मध्ये सामील झाले आहेत तर काही टेलिव्हिजनवर गाजवणारे अभिनेते देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. बिग बॉस 19 च्या घरामध्ये असा एक स्पर्धक आहे ज्याने त्याच्या लाईव्ह शोमध्ये बऱ्याचदा सलमान खानने रोस्ट केले होते. प्रणित मोरे याने त्याचे लाईव्हमध्ये बऱ्याचदा सलमानच्या करिअरवर त्याचबरोबर त्याच्या पैशांवर खिल्ली उडवली होती.
Bigg Boss 19 : सलमान खानच्या घरात पहिली वादाची ठिणगी पेटली! कोणता सदस्य घराबाहेर… पहा प्रोमो
प्रणित मोरे याने एका लाईव्ह शोमध्ये त्याने सलमान खानवर जोक मारला होता, यावेळी तो म्हणाला होता की, तुम्ही सलमान खानच्या समोर पैशांच्या गोष्टी करत आहात, की सलमान पैसे खात आसतो. पण भावा सलमान खान पैसे खातच नाही सलमान तर दुसऱ्याचे करिअर खातो. सलमान खानला जेव्हा रोहीत शेट्टीने सांगितले होते की सिनेमामध्ये कसेही गाड्या चालवू शकतो तर तो यावर सलमान म्हणाला की कुठे सही करायची आहे ते सांग. पण जेव्हा तो स्टेजवर सलमान खान समोर होता तेव्हा तो काहीच बोलू शकला नाही. यावर आता बिग बाॅसचे चाहते आणि सलमान खानचे प्रेक्षक त्याला ट्रोल करत आहेत.
📌 BHAI-DOM :
New season begin and the Live proof of Bhai-dom is also Back!#PranitMore behind the back lame joked a lot
but infront of #SalmanKhan𓃵 , He peed in his pant!THE KHAUF 😮💨🔥#BiggBoss pic.twitter.com/oe2QYLcGgg
— Salmans Thorfinn (@SalmansThorfinn) August 24, 2025
मृदुलने केवळ टास्क गमावला नाही तर शोच्या निर्मात्यांनी त्याला खूप कठोर शिक्षाही दिली. मृदुलला संपूर्ण रात्र बाहेर झोपावे लागले. बिग बॉसच्या १९ व्या सीझनमध्ये फक्त १५ बेड आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. तथापि, शोमध्ये १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. अंतर्गत लोकशाही अंतर्गत, घरातील सदस्यांना बाहेर कोण झोपेल हे ठरवायचे होते? या टास्कमध्ये, मृदुल तिवारीला बाहेर झोपण्यासाठी सर्वाधिक मते मिळाली आणि तो बेडरूमच्या बाहेर झोपत आहे.