फोटो सौजन्य - JioHotstar Reality
सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ मध्ये स्पर्धकांमधील नातेसंबंध बदलताना दिसत आहेत. शत्रू मित्र बनले आहेत, तर मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात झाले आहे. शोशी संबंधित मोठे अपडेट्स समोर येत आहेत. संपूर्ण सीझनमध्ये घराबाहेर काढण्यासाठी दोन स्पर्धकांना नामांकन देण्यात आले आहे. या आठवड्यात नामांकन होणाऱ्या स्पर्धकांमध्ये या दोन सदस्यांची नावे आधीच समाविष्ट करण्यात आली आहेत. यावेळी अलिकडच्या ‘वीकेंड का वार’मध्ये डबल एव्हिक्शन पाहायला मिळाले.
नगमा मिराजकर आणि नतालिया जानोस्झेक यांना घराबाहेर काढण्यात आले आहे. आता नॉमिनेशन टास्क येत्या भागात पाहायला मिळेल. संपूर्ण सीझनमध्ये घराबाहेर काढण्यासाठी दोन सदस्यांना नाॅमिनेट करण्यात आले आहे आणि बिग बॉसने या सदस्यांना का नाॅमिनेट केले आहे? यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
‘बिग बॉस तक’ या बिग बॉसच्या फॅन पेजनुसार, अभिषेक बजाज आणि शाहबाज बदेशा हे संपूर्ण सीझनसाठी नामांकित झालेल्यांमध्ये आहेत. येणाऱ्या भागात या दोघांमध्ये मोठी लढाई पाहायला मिळणार आहे. जिथे या दोघांमधील लढाईचे रूपांतर शारीरिक लढाईत होणार आहे. मारामारीत शारीरिक लढाई होणे म्हणजे बिग बॉसच्या घराचे नियम मोडणे आहे. यामुळेच बिग बॉसने दोघांनाही शिक्षा दिली आणि दोघांनाही संपूर्ण सीझनसाठी नामांकित केले.
शाहबाज बदेशा बिग बॉसच्या घरात येऊन फक्त एक आठवडा झाला आहे. गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने शाहबाज बदेशाच्या घरात प्रवेशाची घोषणा केली. पहिल्याच आठवड्यात शाहबाजला संपूर्ण सीझनसाठी घरातून बाहेर काढण्याचे नामांकन मिळाले आहे. आता नामांकन मिळाल्यानंतर शाहबाजच्या खेळात काय बदल दिसून येतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. त्याची बहीण शहनाज गिलच्या पावलावर पाऊल ठेवून तो मजेदार गोष्टींनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
🚨 BREAKING! Bigg Boss nominated Abhishek & Shehbaz for the entire season as a punishment, not for only 1 week. #BiggBoss19 https://t.co/81mnIbYxuX
— BBTak (@BiggBoss_Tak) September 14, 2025
आता येणाऱ्या भागात प्रेक्षकांना शाहबाजची रागीट बाजू देखील पाहायला मिळणार आहे. यावेळी ‘वीकेंड का वार’ मध्ये फराह खान, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी घरातील सदस्यांना फटकारले. अक्षय आणि अर्शद यांनी घरातील सदस्यांना विनोदाने चिडवले, तर फराह खानने घरातील सदस्यांना त्यांच्या वागण्याबद्दल फटकारले. फराहने कुनिका सदानंद, नेहल चुडासमा आणि बसीर अली यांनाही त्यांचे वर्तन बदलण्यास सांगितले. सोशल मीडियावरही फराहचे खूप कौतुक केले जात आहे.