तुटलेलं हृदय अन्...; बिग बॉसच्या घरातून आर्या जाधवला काढल्यानंतरची पहिली पोस्ट चर्चेत
सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून बिग बॉसवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. कालचा दिवस फक्त आर्यासाठीच नाही तर तिच्या चाहत्यांसाठीही कालचा दिवस खूप वाईट होता. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात निक्की आणि आर्याचं कॅप्टन्सी टास्कमुळे कडाक्याचं भांडण झालं. वॉशरूम एरियामध्ये भांडणाचं रुपांतर मारामारीमध्ये झालं. यामुळे आर्याला काही वेळासाठी जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. काल झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर बिग बॉसने आर्याला घराबाहेर जाण्याची मोठी शिक्षा सुनावली आहे. आर्या जाधवला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतरची पहिली पोस्ट चर्चेत आली आहे.
हे देखील वाचा – रितेश देशमुख देणार आज स्पर्धकांना सरप्राईज! घरातील सदस्य झाले भावुक
आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर अवघ्या काही तासातच पहिली पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ब्लॅक बॅकग्राऊंड दिसतोय आणि त्यावर तुटलेलं हृदय दिसत आहे. सहाजिकचेय आर्याला तडका फडकी बाहेर काढल्यामुळे तिचं हृदय तुटल्याची भावना असावी. बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. तिला एकही संधी न देता किंवा तिला माफ न करता थेट बाहेर काढल्यामुळे नेटकरी बिग बॉस मराठीला आणि रितेश देशमुखला सुद्धा ट्रोल करीत आहेत. निक्कीला आणि अरबाजलाही घराबाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात होती.
निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळे काल बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढले आहे. आर्याने आपली चूक मान्य केली असून तिने निक्कीची आणि बिग बॉसची सुद्धा माफी मागितली आहे. पण इतकं करुनही आर्याला बिग बॉसने घराबाहेर काढण्याची इतकी मोठी शिक्षा सुनावली आहे. फक्त चाहत्यांकडूनच नाही तर सेलिब्रिटींकडूनही ‘बिग बॉस मराठी’ला ट्रोल केलं जात आहे. शोचं नाव ‘बिग बॉस मराठी’ न ठेवता ‘निक्की बिगबॉस मराठी’ अशी मागणी ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने केली आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही मागणी केली आहे. अभिनेत्याच्या ह्या पोस्टवर नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आर्याने शेअर केलेल्या पोस्टवर ४० हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले असून कमेंट करत ‘बिग बॉस मराठी’ला ट्रोल करत बंद करण्याची मागणी देखील केली आहे. “आजपासून ‘बिग बॉस’ बघणं बंद… निक्कीला विनर बनवा आणि काय करायच ते करा.”, “अगं तू जिंकलीस”, “आर्या तू खूप छान खेळलीस. उलट तू चाहत्यांचं मन जिंकलंस… पण तू निक्कीच्या एक नाही दोन कानफाटात मारायला हवी होती”, “अच्छा बिग बॉस ने आर्याला घरातून बाहेर काढलं आता मी बिग बॉससला माझ्या घरातल्या टीव्हीतून बाहेर काढणार परमनंट”, “स्क्रिप्टेड बिग बॉस” असं म्हणत बिग बॉसला ट्रोल केलं जात आहे. तर #boycottmarathibiggboss #IsupportAarya #justiceforaarya #wesupportaarya हे हॅशटॅग वापरून ट्रोलर्स बिग बॉस मराठीला ट्रोल करत आहेत.