कोकण हार्टेड गर्लच्या लग्नाची तारीख आणि वेळ आली समोर, दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात
‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) प्रकाशझोतात आलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासूनच तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्या होणाऱ्या पतीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. अंकिता लवकरच कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, तिच्या लग्नाची तारीख समोर आली असून तिच्या लग्नाची वेळही समोर आली आहे. त्याशिवाय दोघांच्याही घरी लगीनघाईही सुरु झाली आहे.
पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याचे निधन
अंकिता संगीतकार कुणाल भगतबरोबर लग्न करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचं आणि कुणालचं रिलेशनशिप उघड केलं. बिग बॉस मराठीच्या घरात सांगितल्याप्रमाणे अंकिता आणि कुणाल कोकणात अंकिताच्या गावी लग्न करणार आहेत. त्यानंतर मुंबईत रिसेप्शन करणार आहे. पण याचे डिटेल्स अजून समोर आले नाहीयेत. अंकिताने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक डिजिटल पत्रिका शेअर केली होती. ती पत्रिका बनवणाऱ्या व्यक्तीचं आणखी एक इन्व्हिटेशन व्हायरल झालं आहे. त्यावर १६ फेब्रुवारी तारीख लिहिल्याचं म्हटलं जातंय. त्यावरून रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ ला अंकिताचं लग्न असणार आहे. तर काहींच्या मते ही तारीख १५ फेब्रुवारी आहे. पण अजून निश्चित तारीख समजू शकली नाहीये.
विजय देवरकोंडाच्या ‘व्हीडी १२’ सोबत जोडले रणबीर कपूरचे नाव, अभिनेत्याचे चित्रपटासाठी खास योगदान!
व्हायरल होत असलेल्या तारखांपैकी कोणत्या तारखांपैकी अंकिता आणि कुणाल कोणत्या तारखेला लग्न करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लवकरच अंकिता तिच्या लग्नाची खरी तारीख उघड करेल अशी तिच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, कुणालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या घरी लग्नविधींना सुरुवात झाल्याचं दिसत आहे. गावातील देवाला जात असल्याचं दिसतंय. ती व्हिडिओ कुणालने अंकितालाही टॅग केला आहे. त्या व्हिडिओेला अंकिताने रिपोस्ट करत “नवरा आला वेशीपाशी” असं कॅप्शन दिल आहे. दरम्यान, अंकिता इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींना पत्रिका देताना दिसत आहे. शिवाय काही राजकीय नेत्यांनाही ती पत्रिका देताना दिसत आहे.