मैत्री पासून hate you पर्यंत..., बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजमध्ये वादाचे खटके
बिग बॉसच्या घरातील वाद आणखीनच चिघळताना दिसत आहे. गेल्या रविवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्का’नंतर घरातील अनेक स्पर्धकांच्या खेळण्याची स्ट्रेटेजी बदलेली दिसत आहे. आता तर बिग बॉसच्या घरात तीन- तीन ग्रुप झालेले पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरातली कॅप्टन्सी सध्या निक्की तांबोळीकडे आहे. निक्कीकडे कॅप्टन्सी आल्यानंतर तिच्या वागणुकीत प्रचंड बदल झाल्याची चर्चा बिग बॉसच्या घरात तर होतच आहे, पण शिवाय सोशल मीडियावरही होत आहे.
सध्या सोशल मीडियावर आजच्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे. या व्हायरल प्रोमोमध्ये निक्की बाथरूम एरियामध्ये वर्षाताईंना या आठवड्यातील कामाबद्दल सांगत होती. यावेळी तिथे अरबाजही होता. प्रोमोमध्ये, निक्की वर्षाताईंकडे आणखी एक कामाची जबाबदारी देत असते. तर तितक्यात अरबाज, “आधीच वर्षाताईंकडे तीन कामांच्या जबाबदाऱ्या आहेत. तर तुम्ही नका मी करतो.” अरबाज आणि निक्कीमध्ये यामुळे चांगलेच वादाचे खटके उडताना पाहायला मिळत आहे. निक्की उगाच कोणत्याही गोष्टीवरून वाद घालत असते, आता कॅप्टन्सी पदाचा गैरवापर करायला लागली आहे, असा आरोप अरबाज करतो.
निक्की वर्षाताईंकडे, स्वयंपाक घरात दिवसाला जो कचरा साचतो, तो उचलून कचऱ्याच्या डब्ब्यात टाकण्याची जबाबदारी देत असते. पण आधीपासूनच वर्षाताईंकडे कामाची जबाबदारी जास्त असल्यामुळे आता ह्या आठवड्यापासून ते काम अरबाज करणार आहे. कामाचं वाटप करताना, निक्कीमध्ये आणि अरबाजमध्ये चांगलाच वाद होतो. ती म्हणते, “मला तुझ्याशी आय कॉन्टेक्ट करायचा नाही.” तर अरबाजने तिला त्या मागचं उत्तर विचारलं. त्यावर निक्कीने थेट “I Hate You” असंच उत्तर दिलं.
आता अरबाज आणि निक्कीमधील हा वाद आणखी किती दिवस असाच सुरू राहणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.