(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
बॉलिवूडचा हँडसम हंक आणि सुप्रसिद्ध सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्री निर्मळ आहे. दोघेही एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य करत होते. शाहरुख खानने सांगितले होते की, सलमान खानने इंडस्ट्रीत करिअरला सुरुवात केली तेव्हापासून हे दोघेही अत्यंत खास मित्र आहेत. त्यावेळी शाहरुखने सलमानच्या घरी जेवण देखील केले होते.
सलमान खानच्या घरी केले जेवण
2018 साली बादशाह खान सलमान खानच्या दस का दम या शोमध्ये आला होता. त्यावेळी त्याने मुंबईत आल्यानंतर इंडस्ट्रीतील त्यांच्या संघर्षाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. अभिनेत्याने सांगितले होते की सलमानने त्याला खूप मदत केली आणि त्याच्या कुटुंबानेही त्याची खूप काळजी घेतली. असे अभिनेत्याने सांगितले. शाहरुख म्हणाला, “सलमान माझ्यापेक्षा अडीच वर्षांनी लहान आहे पण त्याने मोठ्या भावाप्रमाणे माझी काळजी घेतली आणि त्याच्या कुटुंबानेही माझ्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. मी फक्त धक्केच नाही तर यांच्या घरातील जेवणही खाल्ले आहे.” असे तो म्हणाला.
हे देखील वाचा- ‘इतरांचा अपमान करत नाही’, नतासाने हार्दिक पांड्याच्या घटस्फोटानंतर शेअर केली क्रिप्टिक नोट!
अनेक चित्रपटांमध्ये केले एकत्र काम
या दोन्ही कलाकारांच्या मैत्रीत अनेक चढउतार आले पण त्यांच्यातील बंध कायम राहिले. 1995 मध्ये करण अर्जुन या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. 2002 मध्ये शाहरुख खानने सलमान खानच्या हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटात खास भूमिका साकारली होती. यानंतर, 2023 मध्ये सलमान खान शाहरुखच्या पठाण चित्रपटात दिसला होता, तर त्याच वर्षी रिलीज झालेल्या टायगर 3 मध्ये शाहरुखचा कॅमिओ दिसला होता. असे अनेक चित्रपटामध्ये या दोघांनी एकत्र काम केले आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख लवकरच त्याची मुलगी सुहाना खानसोबत किंग या चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. सध्या सलमान खान सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपटदेखील लवकरच रिलीज होणार आहे.