विराट कोहलीसोबत लग्न करण्यापूर्वी अनुष्का शर्मा कोणत्या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती? नाव ऐकलंत तर चक्रावून जाल...
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. या कपलच्या लग्नाला सध्या २०२४ मध्ये ७ वर्षे झाली आहेत. या जोडप्याला मुलगी वामिका आणि मुलगा अकाय अशी दोन मुलं आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? विराट कोहलीसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असलेली अनुष्का शर्मा, लग्नाच्या आधी दुसऱ्या भारतीय क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर ती विराट कोहलीच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं.
सनी देओल- संजय दत्तच्या BAAP बद्दल समोर आली महत्वाची अपडेट, केव्हा होणार चित्रपट रिलीज ?
खरंतर, बॉलिवूडचं क्रीडा जगतासोबत फार जुने संबंध आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रसिद्ध क्रिकेटर्ससोबत लग्न केलेले आहेत. या यादीमध्ये, अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सुर अली खान पतौडी, रीना रॉय आणि मोहसिन खान, संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझारुद्दिन, गीता बासरा आणि हरभजन सिंग, हाझिल किच आणि युवराज सिंग, सागरिका घाटगे आणि झहीर खान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, नताशा स्टॅनकोव्हिक आणि हार्दिक पांड्या, आथिया शेट्टी आणि के.ए. राहुल सारख्या अनेक सेलिब्रिटी कपलचा समावेश आहे.
“आम्हाला लग्नंच करायचं नव्हतं”, आमिर सोबतच्या घटस्फोटानंतर किरण रावचा धक्कादायक खुलासा