सनी देओल- संजय दत्तच्या BAAP बद्दल समोर आली महत्वाची अपडेट, केव्हा होणार चित्रपट रिलीज ?
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सनी देओल, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ हे ४ सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘बाप’ असं आहे. येत्या २०२५ मध्येच ‘बाप’ चित्रपट रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. ८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारे हे कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. खरंतर, २०२५ मध्ये अनेक चित्रपटांतून सनी देओल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जाट’, ‘लाहोर १९४७’ आणि तिसरा ‘बाप’…
“आम्हाला लग्नंच करायचं नव्हतं”, आमिर सोबतच्या घटस्फोटानंतर किरण रावचा धक्कादायक खुलासा
या तिनही चित्रपटांची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटांसाठी उत्सुक आहेत. सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. सनी देओलच्या ‘बाप’ चित्रपटाचे संपूर्ण काम आता पूर्ण झाले आहे. चित्रपटातील खलनायकाने चित्रपटाबद्दलची एक महत्वाची अपडेट दिली आहे. मार्कोचा व्हिलन म्हणजेच कबीर दुहान सिंग याने नुकतंच TV9 हिंदी डिजिटलशी खास बातचीत केली आहे. काही दिवसांपूर्वी मार्को हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला. भारतातील थ्रिलर चित्रपटांपैकी एक असलेल्या चित्रपटाला पाहताच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात खलनायक बनलेला कबीर दुहान सिंग आता सनी देओलच्या अडचणी वाढवायला येत आहे.
TV9 हिंदी डिजिटलशी बोलताना कबीर दुहान सिंगने ‘बाप’चे अनेक अपडेट्स चाहत्यांना दिले आहे. त्याने सांगितले की, आम्ही अहमद खान निर्मित ‘बाप’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. चित्रपटात सनी देओलशिवाय जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि मिथुन चक्रवर्तीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा एक पोस्टरही रिलीज झाला होता. त्याबद्दल कबीर दुहान सिंहने सांगितले की, मी चार सुपरस्टारसोबत काम करणार आहे. म्हणजे चित्रपटात चौघांनाही अडचणीत आणणारा तो खलनायक बनणार आहे, हे अगदी स्पष्ट झालं आहे. कबीर दुहान सिंग ‘बाप’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या कमर्शियल चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट रिलीजसाठी पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.
कबीर दुहान सिंगने सांगितलेली माहिती ऐकून हे स्पष्ट झाले की, २०२५ या वर्षात सनी देओलचे ३ चित्रपट रिलीज होणार आहेत. मात्र निर्मात्यांनी अद्याप त्याच्या रिलीज डेटबाबत कोणतेही अपडेट दिलेली नाहीत. पण त्या तीन चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बाप’ चित्रपटाबद्दल कबीर दुहान सिंगने महत्वाचे गुपित उघड केले आहे. सनी देओलच्या ‘बाप’ चित्रपटाचे कोणतेही अपडेट समोर आले नव्हते, पण आता चित्रपटातील कलाकारानेच समोर आणल्याने चाहते खूश झालेत. हा एक ॲक्शन चित्रपट आहे. ज्यामध्ये 80 आणि 90 च्या दशकातील चार ॲक्शन सुपरस्टार एकत्र येणार आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला होता. त्यानंतर हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यानंतर तसे झाले नाही. आता २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात सनी देओल गँगस्टर अवतारात दिसला होता. विवेक चौहान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.