(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सलमान खान बॉलीवूडच्या अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याचे फॅन्स मोठ्यांपासून ते लहानांपर्येंत सगळेच आहेत. त्याची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही आहे. या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. आता भाईजानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला लोक पसंतही करत आहेत. आणि चाहत्यांना या कलाकाराचा अभिमानदेखील वाटत आहे. वास्तविक, सलमान अलीकडेच एका कार्यक्रमात गेला होता, जिथे एक लहान चाहता त्याला भेटला. यादरम्यान मुलाने मंचावर सलमान खानच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर अभिनेत्याने असे काही केले जे पाहून चाहत्यांची मने त्याने पुन्हा एकदा जिंकली आहेत. आता त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलाने सलमानच्या पायाला केला स्पर्श
पापाराझी अकाउंट वरिंदर चावलाने त्याच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा स्टेजवर जाऊन आधी सलमान खानला मिठी मारताना दिसत असून यानंतर तो त्याला पेंटिंग दाखवताना दिसत आहेत. ज्यावर भाईजान त्याचा ऑटोग्राफही देत आहेत.
लोकांना हा व्हिडिओ आवडला
सलमान खानचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने ‘सुंदर’ असे लिहिले. तर दुसऱ्याने ‘भाईजान’ कमेंट केली. याशिवाय इतर लोकांनीही त्यांचे कौतुक केले आहे. सलमान खान हा बॉलीवूडमधील अत्यंत मेहनती आणि उत्साही नट आहे. त्याच्या या प्रेमळ स्वभावामुळे चाहत्यांना त्याचे कौतुक आहे.
हे देखील वाचा- विजय वर्माने तमन्नासहच्या नात्याबद्दल सोडले मौन, म्हणाला- ‘आम्हाला भावना लपवायच्या नाहीत…’
या चित्रपटात सलमान दिसणार
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘सिकंदर’ चित्रपटात दिसणार आहे, जो पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या सिनेमात रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा देखील नवीन असल्यामुळे प्रेक्षकांना नवा अनुभव घेता येणार आहे.