(फोटो सौजन्य- Social Media)
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे नाते कोणापासून लपलेले नाही. दोघंही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत आणि अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात. पण अशा वेळी जेव्हा जोडप्यांना त्यांचे नाते गुप्त ठेवायचे होते, तर तमन्ना आणि विजय यांनी त्यांचे नाते सार्वजनिक का केले? यावर चाहत्यांना प्रश्न पडला आहे. याचेच उत्तर अभिनेत्याने एका मुलाखतीत दिले आहे.
दोघांनी का नाही लपवले नाते?
यावर आता अभिनेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. विजय वर्मा यांनी शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्हाला आमच्या भावना लपवायच्या नसल्यामुळे आम्ही आमचे नाते उघड केले आहे. तमन्ना आणि मी दोघांनीही मान्य केले की जर आपण एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत असू आणि आपल्याला एकमेकांची आवड असेल तर ही भावना लपवायची गरज नाही. नातं लपवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही एकत्र बाहेर जाऊ शकत नाही, मित्र तुमचे फोटो क्लिक करू शकत नाहीत. मला अशी बंधने आवडत नाहीत.” असे अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले.
इतरांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो
अभिनेता पुढे म्हणाला, ‘तथापि, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी लोकांसमोर आणत नाही. उदाहरणार्थ, माझे आणि तमन्नाचे जवळपास ५००० फोटो एकत्र आहेत पण ते सार्वजनिक ठिकाणी कुठेही उपलब्ध नाहीत कारण ते फक्त आमच्यासाठी आहेत. विजय हसत हसत म्हणाला की प्रत्येकाच्या आत एक काकू दडलेली असते आणि त्यांना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घ्यायचे असते. जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याच्या नातेसंबंधावर त्याच्या कामावर परिणाम झाला का, तेव्हा अभिनेता म्हणाला की मला माझ्या कामाची प्रशंसा मिळते आणि मी हे नाकारू शकत नाही.’ असे त्याने सांगितले.
हे देखील वाचा- Naga Chaitanya Baraat : नागा चैतन्य आणि शोभिताचं गुपचूप लग्न ? फुलांनी सजलेल्या विंटेज कारमध्ये निघाली अभिनेत्याची वरात, Video Viral
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी 2023 मध्ये ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली. या चित्रपटात दोघेही एकत्र दिसले होते. यानंतर दोघेही गोव्यात एकत्र सुट्टी साजरी करताना नजर आले. आणि आता दोघांनीही एकमेकांच्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितले आहे.