(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ चा वीकेंड का वार सुरू आहे. शोचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे, ज्यामध्ये युट्यूबर अभिषेक मल्हान आणि विनोदी कलाकार हर्ष गुजराल पाहुणे म्हणून स्जभागी होताना दिसणार आहेत. हे दोघे स्पर्धकांवर मस्करी करताना दिसत आहेत. शिवाय, हर्ष तान्या मित्तलच्या संपत्तीवर प्रतिक्रिया देतानाही दिसत आहे. प्रोमो पाहून बिग बॉसप्रेमी देखील खुश झाले आहे. आता येणाऱ्या आगामी भागात काय पाहायला मिळेल यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
प्रणीत मोरे आणि बसीर अली यांची खिल्ली उडवली
हर्ष गुजराल आणि अभिषेक मल्हान बिग बॉस १९ च्या वीकेंड वारसाठी उपस्थित झाले होते. शोच्या नवीन प्रोमोमध्ये, होस्ट आणि अभिनेता सलमान खान त्यांचे स्वागत करताना दिसला आहे. विनोदी कलाकार हर्ष नंतर स्पर्धक प्रणीत मोरेला विचारतो, “तुम्ही किती वर्षांपासून कॉमेडी करत आहात?” यावर प्रणीत म्हणतो, ‘७ वर्षांपासून.’ मग हर्ष मस्करीत म्हणतो, ‘पहिल्यांदाच आम्हाला तुमचा अभिमान वाटत आहे.’ पुढे प्रोमोमध्ये हर्ष म्हणतो, ‘माझे वडील परवा घरी ओरडले आणि म्हणाले की सर्वजण या, बसीरने कपडे घातले आहेत.’ हे ऐकून सर्व स्पर्धक हसायला लागतात.
तान्या मित्तललाही केले रोस्ट
व्हिडिओमध्ये विनोदी कलाकार हर्ष गुजराल तान्या मित्तलची नक्कल करताना दिसतो आहे. विनोदी कलाकार म्हणाला, “माझी आई मिस इंडिया होती आणि माझ्या तिन्ही बहिणी मिस युनिव्हर्स होत्या.” त्यानंतर तो युट्यूबर अभिषेक मल्हानला सांगतो, “भाऊ, मी कितीही फेकले तरी मी तान्यापेक्षा जास्त फेकू शकत नाही.” त्यानंतर हर्ष तान्याला म्हणतो, “तू घरात आल्यापासून आपल्या देशाचा जीडीपी घसरला आहे.” हे ऐकून सगळे हसून हसून लाल पडतात. येणाऱ्या भागात नक्कीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होताना दिसणार आहे.
मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
गौहर खानने देखील स्पर्धकांचा घेतला क्लास
‘बिग बॉस ७’ विजेती गौहर खान ‘बिग बॉस १९’ च्या स्पर्धकांना या वीकेंड वारमध्ये भेटायला आली होती. तिने आवेज दरबारला त्याच्या धक्कासाठी लढायला सांगितले. तसेच बसीर अली आणि अमालला फटकारताना दिसली. तसेच आजच्या वीकेंड का वार मध्ये एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. आता हा स्पर्धक नक्की कोण आहे हे येणाऱ्या भागातच स्पष्ट होणार आहे.