(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडच्या चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतिक्षित ‘नो एंट्री 2’ या चित्रपटात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बोनी कपूर निर्मित आणि अनीस बज्मी दिग्दर्शित ‘नो एंट्री 2’साठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आधी दिलजीत दोसांझ याने या प्रकल्पातून बाहेर पडल्याने चाहत्यांना निराशा झाली होती. आणि आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अभिनेता वरुण धवनने ‘नो एंट्री २’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही वैयक्तिक कारणास्तव या प्रोजेक्ट्मधून वरुण धवनने एक्झिट घेतल्याचं कळतंय. अलिकडेच या प्रोजेक्टमधून दिलजीत दोसांझने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली. असं असतानाच आता या चित्रपटाबद्दल ही एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरूण आगामी चित्रपट ‘भेडिया २’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दोन्ही चित्रपटांच्या तारखांमध्ये क्लॅश होत असल्याने अभिनेत्याने हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, याबाबत वरुण किंवा निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते बोनी कपूर अजूनही यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य देण्याच्या मूडमध्ये नाहीत, मात्र ‘नो एंट्री 2’ साठी आता अर्जुन कपूर याच्यासोबत झळकण्यासाठी दोन नवीन चेहऱ्यांचा शोध सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं की दिलजीत दोसांझ आता ‘नो एंट्री २’ या चित्रपटाचा भाग राहिलेला नाही. त्यांनी सांगितलं, “त्याची वेळ आमच्या शेड्यूलशी जुळल्या नाही, पण आम्ही लवकरच एक पंजाबी चित्रपट एकत्र करण्याची अपेक्षा करतो.”
दरम्यान, आता चित्रपटाच्या टीमसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्या जागी नव्या कलाकारांची निवड. सध्या केवळ अर्जुन कपूर हाच मूळ स्टारकास्टमध्ये कायम आहे.चित्रपटाच्या मूळ भागात सलमान खान, अनिल कपूर आणि फर्दिन खान हे झळकले होते. मात्र सीक्वेलमध्ये पूर्णपणे नवीन स्टारकास्ट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Actress Success Story: “कधीच चालू शकणार नाही”, पण डान्सने ‘तिला’ दिलं नवीन आयुष्य!
चित्रपटाची कथा अधिक मजेशीर, धक्कादायक ट्विस्टने भरलेली आणि आजच्या प्रेक्षकांना साजेशी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे दोघेही आता जेपी दत्ताच्या ‘बॉर्डर 2’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, जिथे सनी देओल आणि अहान शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत आहेत.