(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतातील मनोरंजनसृष्टी ही मोठी, झगमगती आणि स्पर्धात्मक आहे. काही कलाकारांना इथे यश सहज मिळतं, तर काहींना आपल्या कष्टांनी आणि संघर्षाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं लागतं. अशाच कलाकारांपैकी एक आहे अभिनेत्री आणि डान्सर शक्ति मोहन, जिला एकेकाळी पायांवर उभं राहणंही अशक्य वाटत होतं. पण आज तिचं नाव संपूर्ण जगभर ओळखलं जातं.
2010 मध्ये झी टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स सीझन २’ (DID 2) मधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. तिच्या कंटेम्पररी आणि जॅझ डान्स स्टाइल्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि ती शोची विजेती ठरली. एका गंभीर अपघातामध्ये शक्ति मोहन खूपच जखमी झाली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की ती कदाचित पुन्हा कधीच चालू शकणार नाही. तिला तिच्या पायामुळे खूपच त्रास सहन करावा लागला होता. मात्र तिने जिद्दीने या सगळ्यावर मात केली.
DID जिंकल्यानंतर 2011 मध्ये ‘दिल दोस्ती डान्स’ या मालिकेत ती झळकली. ही मालिका खूप यशस्वी ठरली. त्यानंतर ती ‘प्रीत से बांधी ये डोरी राम मिलायी जोड़ी’, ‘एक हज़ारों में मेरी बहना है’, ‘पुनर्विवाह, जिंदगी मिलेगी दोबारा’, आणि ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ या मालिकांमध्येही दिसली. शक्ति मोहनने केवळ डान्स आणि अभिनयातच नव्हे तर टीव्हीवरील जज म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती रेमो डिसूझा यांच्या पॉप्युलर डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स प्लस’ च्या सर्वच सीझन्समध्ये जज म्हणून झळकली आहे.
या शोमध्ये शक्ति मोहन आणि राघव जुयाल यांची धमाल केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. राघवची मजा आणि शक्ति मोहनची गोड प्रतिक्रिया, या दोघांची जोडी प्रेक्षकांना अधिकच आवडत आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या मस्तीला भरभरून प्रेम दिलं आणि त्यांचा शो एकापाठोपाठ एक हिट ठरला.
सोहम शाह यांनी चित्रपटामागील खरे स्वप्न उलगडले!, ‘Tumbbad 2′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
शक्ति मोहनसाठी सर्वात मोठा संघर्ष तिच्या ‘डान्स इंडिया डान्स सीझन २’ च्या ऑडिशनपासूनच सुरू झाला. तिने अनेकदा मुलाखतीत सांगितलं आहे की, ऑडिशनच्या दिवशी तिला तासंतास उभं राहावं लागलं होते. तिला उपाशी पोटी राहावे लागले होत. एक क्षण असा आला की वाटलं, “बस! आता परत जाऊया…”