(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’मधील स्पर्धक तान्या मित्तल हिची शोमध्ये आल्यापासूनच जोरदार चर्चा सुरू आहे. ग्वाल्हेर येथील ही उद्योजिका, मॉडेल व सोशल मीडियावर लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे.शोमध्ये ती ५०० पेक्षा अधिक कस्टमाइज्ड साड्या, सुमारे ५० किलो दागिने, स्वतःची चांदीची भांडी व बाटली घेऊन आल्याचा दावा तिने केला होता.यानंतर तिच्या अनेक ‘राजेशाही’ शैलीतील वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तिनं शोमध्ये सांगितलं की, मी “मी कॉफी पिण्यासाठी ग्वाल्हेरहून आग्र्याला जाते, “माझं बिस्किट लंडनहून येतं”, तसेच”मी ग्वाल्हेरहून सहा तास प्रवास करून आवडती डाळ खायला जाते”अशा तिच्या वक्तव्यांमुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या या वक्तव्यांमुळे ती नेहमीच ट्रोल होत असून सोशल मीडियावर अधिकच चर्चेत आली आहे.
‘बिग बॉस १९’ मधील स्पर्धक तान्या मित्तल सध्या तिच्या लक्झरी स्टाईल, वादग्रस्त विधानं आणि एकूणच वर्तनामुळे चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे हिनं तान्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री चाहत पांडेनं तान्याला खोटारडी, असं म्हटलं आहे तसेच मला एकदा तरी तान्याचं घर पाहायचं आहे, अशी इच्छा चाहतने व्यक्त केली आहे.
चाहत पांडे हिने ‘टेली मसाला’ला दिलेल्या एका मुलाखतीत तान्या मित्तलवर टीका केली असून. तिने थेट तान्याच्या ‘लक्झरी लाईफस्टाईल’च्या दाव्यांवर संशय व्यक्त केला आहे. चाहत ने सांगितलं, ”मला असं वाटतं, मला तान्याचं घर बघावं लागेल,बिग बॉस’नंतर तान्या मित्तल, मला तुझ्या घरी बोलाव. माझ्यासह अनेक लोक आहेत, जे तुझं घर पाहू इच्छित आहेत. कृपया बाहेर ये आणि आम्हाला बोलाव. मी सगळ्यांना तुझं घर दाखवेन. मला हे जाणून घ्यायचं आहे की, तुझ्या घरासमोर सेव्हन स्टार आणि फाईव्ह स्टार किती कमी आहेत? हे बघायला हवं.”
Actress Success Story: “कधीच चालू शकणार नाही”, पण डान्सने ‘तिला’ दिलं नवीन आयुष्य!
त्यानंतर अभिनेत्रीने तान्याच्या डाळ आणि कॉफीविषयी झालेल्या चर्चांबद्दल प्रतिक्रिया दिली, म्हणाली, ”सुरूवातीला मला हे थोडं मनोरंजक वाटात होतं, पण तान्या मला आता प्रत्येक बाबतीत खोटीच वाटते आहे, तिली बघूनच चीड येते. ती फारच खोटी आहे.”