Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Dixit: ‘धक-धक गर्ल’ भारतात परतण्यामागचं कारण काय? अमेरिकेतील लाइफस्टाइललाही दिली होती पसंती

जवळजवळ एक दशक अमेरिकेत जीवन जगल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित भारतात का परतली याचे कारण आता समोर आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 07, 2025 | 06:05 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडची “धक-धक” गर्ल माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेनेशी लग्न केल्यानंतर अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ एक दशक अमेरिकेत तिचे स्वप्नवत जीवन जगल्यानंतर, माधुरी भारतात परतली. अलीकडेच माधुरीने तिच्या निर्णयामागील कारण उघड केले. रणवीर अलाहबादियाच्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन संभाषणात, “दिल तो पागल है” अभिनेत्रीने अमेरिकेतील तिच्या शांत जीवनाबद्दल आणि तिच्या परतण्यामागील भावनिक कारणांबद्दल उघडपणे सांगितले.

अमेरिकेतील तिच्या आयुष्याबद्दल विचारले असता,तिने सांगितले, “अमेरिकेत मी खूप आनंदात राहत होते. तिथे शांत वातावरण असायचं… आम्ही कुटुंब म्हणून खूप मजा करायचो. मी माझ्या मुलांसोबत प्रत्येक क्षण घालवला.त्यांना गार्डनमध्ये घेऊन जायचे, त्यांच्यासोबत खेळायचे. भारतात परतण्याचा निर्णय आम्ही दोघांनीही (मी आणि माझे पती) खूप विचार करून आणि पूर्ण जाणीवपूर्वक घेतला”

माधुरीसाठी, हा काळ स्वप्नासारखा अध्याय बनला जिथे तिने मातृत्वाचा पूर्ण आनंद घेतला. भारतात परतण्याचा निर्णय अचानक घेतला गेला नव्हता. माधुरीने स्पष्ट केले की त्यामागे अनेक भावनिक कारणे होती, विशेषतः तिच्या पालकांशी संबंधित. अनेक गोष्टी एकत्र आल्या. माझे आई-बाबा माझ्यासोबत अमेरिकेत राहत होते. त्यांचं वय वाढत होतं आणि त्यांना भारतात परत यायचं होतं. मला त्यांना एकटे इथे पाठवायचं नव्हतं, कारण आमचे सगळे नातेवाईक आणि चुलत भावंडे अमेरिकेतच होती. माझ्या करिअरभर आई-बाबांनी मला खूप साथ दिली, त्यामुळे त्यांना एकटं सोडणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलांना आपली संस्कृती समजावी, हेही मला महत्त्वाचं वाटलं”

girija oak: नॅशनल क्रशचे साडी कलेक्शन चर्चेत; “ही साडी तर किडनीच्या किंमतीइतकी!”,तर काही 50-60 वर्ष आहेत जुन्या

तिच्या परत येण्याचे ”आणखी एक प्रमुख कारण म्हणजे माझे काम येथे होते.शूटिंगचं जे शेड्यूल असेल ते पूर्ण करून मला पुन्हा अमेरिकेत जायचं असायचं. आणि परत नवे काम असेल तर पुन्हा भारतात यावं लागायचं. भारत-अमेरिका हा वारंवारचा प्रवास खूप थकवणारा होता आणि त्यात माझा खूप वेळही जात होता. त्यामुळे राम आणि मी दोघांनीही शांतपणे सर्व गोष्टींचा विचार केला. त्यांचंही भारतात बरंच काम होतं… त्यामुळे आम्ही इथे परतण्याचा निर्णय घेतला. माझ्या खूप मैत्रिणीही भारतात आहेत, त्यामुळे अमेरिकेत असताना मला भारताची सतत आठवण येत असे..” असे माधुरी दीक्षितने सांगितले.

एकच हृदय आहे कितीवेळा जिंकणार! सलमान खानने घेतली छोट्या चाहत्यांची भेट, Viral Video मध्ये दिसली गोड केमिस्ट्री

Web Title: Actress madhuri dixit revealed why she left her dream life in us and returned to india here is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • madhuri dixit

संबंधित बातम्या

बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चा; अफगानिस्तानी क्रिकेटरसोबत करणार लग्न?
1

बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चा; अफगानिस्तानी क्रिकेटरसोबत करणार लग्न?

2025 पूर्णपणे Akshaye Khannaच्या नावावर;धुरंधरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिला सुपरहिट परफॉर्मन्स
2

2025 पूर्णपणे Akshaye Khannaच्या नावावर;धुरंधरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिला सुपरहिट परफॉर्मन्स

Dharmendra यांची शेवटची इच्छा अपुरीच; ‘गदर’ दिग्दर्शक अनिल शर्मा याच्याकडून तीन विनंत्याही राहिल्या अपूर्ण
3

Dharmendra यांची शेवटची इच्छा अपुरीच; ‘गदर’ दिग्दर्शक अनिल शर्मा याच्याकडून तीन विनंत्याही राहिल्या अपूर्ण

”नाही सर.. रेखाजींना आजही तुम्ही आवडता..” अमिताभ बच्चन यांच्या पोस्टचा फॅन्सने काढला दुसरा अर्थ, डबल मीनिंगमुळे रंगली चर्चा
4

”नाही सर.. रेखाजींना आजही तुम्ही आवडता..” अमिताभ बच्चन यांच्या पोस्टचा फॅन्सने काढला दुसरा अर्थ, डबल मीनिंगमुळे रंगली चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.