(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
गिरीजा ओक गोडबोले काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही मराठी अभिनेत्री रातोरात नॅशनल क्रश बनली,गिरिजा ओकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती नॅशनल क्रश बनली. निळ्या रंगाची साडी नेसलेला फोटो व्हायरल झाला तिच्या या सुंदर आणि पारंपारिश शैलीचे चाहत्यांनी खुप कौतुक देखील केले आहे.
अलिकडेच तिने ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली होती. तिचा साधा पण आकर्षक पेहराव, बोलणे आणि सुलभपणा यामुळे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले.
अभिनेत्री गिरीजा ओकने नुकतेच हॉटरफ्लायशी संवाद साधला. अभिनेत्रीने तिच्याजवळच्या काही साड्यादेखील दाखवल्या.बोलताना गिरीजाने आपल्या साडी प्रेमाबद्दल मोठा खुलासा केला. तिने सांगितले की, तिच्याकडे 400 पेक्षा अधिक साड्या आहेत.यावेळी तिने तिच्या आवडत्या साड्या दाखवल्या. यात तिच्या आई आणि आजींकडून वारशाने मिळालेल्या साड्या देखील आहे. प्रत्येत साडी महाग आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील, परंपरेशी निगडित अश्या साड्या माझ्याजवळ आहेत असे सांगितले.
अभिनेत्रीने तिच्याजवळील 60- 70 वर्षांपूर्वीची साडी दाखवली. जी तिच्या आजीची असल्याचे सांगितले. तर या साड्यांच्या कलेक्शन मध्ये क्री रंगाची साडी ही तिने हाताने रंगवली असून, शिफॉन साडी असल्याचे गिरीजा म्हणाली. गिरीजा ओकने आपल्या साडी कलेक्शनमध्ये आणखी एका खास साडीची ओळख करून दिली. ती म्हणाली की, तिच्याकडे असलेली बनारसी जमावर साडी ही तिची आवडती साडी आहे. गिरीजाने सांगितले, ”ही माझी आवडती साडी आहे, थोडी महाग आहे. काही किडन्यांच्या किमतीइतकी याची किंमत आहे. लाखो रुपये खर्च झाले आहेत यावर. माझ्याकडे एकच रॉ मँगो बनारसी जमावर साडी आहे. अशी आणखी साडी घेणं परवडत नाही, पण हा रंग खूप सुंदर आहे.”
पुढे गिरीजा म्हणाली, जर तुम्ही एखादी साडी व्यवस्थित ठेवली, तर त्या टिकतात. सगळ्यांनाच साडी चांगली दिसते.गिरीजा ओकने तिच्या साडी कलेक्शनची ओळख करून दिली, ज्यात विविध प्रकारच्या साड्या समाविष्ट होत्या. यात लेहेरिया साड्या, ब्लॉक-प्रिंटेड डिझाइन, कलमकारी ड्रेप्स, एक क्लासिक महाराष्ट्रीयन पैठणी आणि जॉर्जेट लेहेरिया साडी यांचा समावेश होता. गिरीजा म्हणाली, ”ही जॉर्जेट लेहेरिया साडी आहे, जी मी एका लहान बॉक्समध्ये खरेदी केली होती. ती गुजरातमधून आणली.” तिने स्वतः ब्लॉक-प्रिंट केलेली साडी देखील दाखवली. तिच्या कलेक्शनमधील ऑड्रे हेपबर्न-प्रिंट साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.






