(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हैदराबादमधील एका कार्यक्रमात बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने त्याच्या तरुण चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. त्याने मुलांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी खास वेळ काढला. या गोड क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि सर्वांची मने जिंकत आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेत्याची मुलांसोबत एक खास भेट
शनिवारी, सलमान खान हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियममध्ये इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होता. उपस्थित मुलांना पाहून सलमान थांबला. त्याने प्रत्येकाची भेट घेतली, त्यांना आशीर्वाद दिले, त्यांना मिठी मारली आणि फोटोही काढले. त्याला भेटून मुले खूप आनंदी झाली आणि आनंदाने नाचू लागली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
‘देवों के देव महादेव’ मधील ‘पार्वती’ सोनारिका भदोरियाने दिला गोड मुलीला जन्म, फोटो शेअर करत म्हणाली…
सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडीओला हृदयस्पर्शी आणि गोड म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “सलमान भाई खूप साधे आहेत.” दुसऱ्याने लिहिले, “भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रिय मेगास्टार, सलमान खान.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “प्रत्येकाचे हृदय भाईजानसारखे नसते.”
२,५०,८९९ मतांनी आघाडीवर असलेला ‘हा’ स्पर्धक होणार विजेता? गौरव आणि फरहानाला मिळणार ठेंगा
सलमान खानचे आगामी चित्रपट
सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. सलमान खान “बॅटल ऑफ गलवान” चे चित्रीकरण करत आहे. तसेच सध्या तो “बिग बॉस सीझन १९” चे सूत्रसंचालन देखील करत आहे. त्याच्या आगामी चित्रपट “टायगर व्हर्सेस पठाण” ची चाहते आतुरतेने वाट पाहत असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख एकत्र काम करताना दिसणार आहेत.






