Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

प्रतिभावान अभिनेत्री अदिती मुखर्जीचे धक्कादायक अपघाती निधन झाले आहे. रस्ते अपघातात झालेल्या तिच्या दुःखद निधनामुळे तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. अदिती आशुतोष राणा यांच्यासोबत तिने काम देखील केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 19, 2025 | 10:54 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू
  • ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम
  • उपचारांदरम्यान अभिनेत्रीचे निधन
 

चित्रपट अभिनेत्री अदिती मुखर्जीचे रस्ते अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या या धक्कादायक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आदिती नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात एका नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडली होती आणि वाटेतच एका भरधाव वाहनाने अभिनेत्रीच्या कॅबला धडक दिली. या दुर्दैवी अपघातात आदितीचा जीव गेला. आणि अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. आदिती मुखर्जीच्या निधनाची बातमी कळताच आता चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे, अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीने नुकतेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत काम केले होते.

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

उपचारांदरम्यान अभिनेत्रीचे निधन

भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या नंतर आदिती मुखर्जीला ग्रेटर नोएडा येथील शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना तिचा जीव वाचवता आला नाही आणि अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले. आदिती तिच्या घरातून नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गौतम बुद्ध विद्यापीठात कॅबमधून प्रवास करत होती. आदितीच्या मृत्यूची माहिती मिळताच नाट्य कलाकारांनाही धक्का बसला आणि कार्यक्रमादरम्यान आदितीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

अदिती कोण होती?

आदिती मुखर्जी तिचा भाऊ अरिदम मुखर्जीसोबत दिल्लीतील महिपालपूर येथे राहत होती. आदितीचे कुटुंब ओडिशामध्ये आहे. आदिती अस्मिता थिएटरची माजी विद्यार्थिनी होती, जिथे तिने अभिनयाचे शिक्षण घेतले. अस्मिता थिएटरचे संचालक अरविंद गौर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आदितीच्या मृत्यूची बातमी शेअर केली. आदिती २०२२ च्या थिएटर बॅचमधील एक हुशार विद्यार्थिनी होती आणि ती खूप चांगली अभिनेत्री होती. आता आणखी एक अभिनेत्रीच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”

नाट्य दिग्दर्शकांनी दिली निधनाची बातमी

अरविंद गौर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अदिती सध्या बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणा आणि राहुल भुचर यांच्या “हमारे राम” या नाटकावर काम करत होती. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अपघातात अदितीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर तिचे पालक ओडिशाहून दिल्लीला आले आहेत. अदितीचे निधन ही नाट्य जगतासाठी एक दुःखद बातमी आहे.

 

Web Title: Aditi mukherjee passed away in road accident ashutosh rana theater actress death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • Accident News
  • entertainment
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल
1

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?
2

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी
3

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी

Ramayana: थिएटरनंतर ‘रामायण’ घरबसल्या पाहता येणार; नमित मल्होत्रा आणि ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मची ऐतिहासिक भागीदारी
4

Ramayana: थिएटरनंतर ‘रामायण’ घरबसल्या पाहता येणार; नमित मल्होत्रा आणि ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मची ऐतिहासिक भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.