Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर माधुरी दीक्षितने नम्रता संभेरावच्या ‘लॉली’ची नक्कल केली. ‘मेरी आँखों में झाँको!’ हा डायलॉग म्हणत माधुरीने सर्वांना हसवलं.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 22, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Madhuri Dixit:  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सहजसुंदर शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्रश्नोत्तरांच्या खेळासोबतच स्पर्धक आणि सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत रंगणाऱ्या तिच्या दिलखुलास गप्पाही प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. आता आगामी भागात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम सहभागी होणार असून, या भागात धमाल-मस्तीचा तडका पाहायला मिळणार आहे.

माधुरी दीक्षितने केली नम्रता संभेरावच्या ‘लॉली’ची नक्कल!

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर यावेळी माधुरी दीक्षितने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच गप्पांदरम्यान नम्रता संभेरावच्या लोकप्रिय ‘लॉली’ या पात्राचा विषय निघाला. माधुरीने आपल्याला लॉलीची भूमिका खूप आवडत असल्याचे सांगितले. हे ऐकून नम्रताचा आनंद गगनात मावेनासा झाला.

माधुरीने लॉलीच्या पात्राचे कौतुक करताच नम्रताने आश्चर्याने तिला विचारले, “तुम्ही माझं हे कॅरेक्टर पाहिलं आहे?” यावर माधुरीने होकार देत नम्रताच्या डेंटिस्टच्या स्किटचीही आठवण सांगितली. त्यानंतर नम्रताने माधुरीला लॉलीचा एखादा डायलॉग बोलण्याची विनंती केली.

‘मेरी आँखों में झाँको!’ म्हणत माधुरीने जिंकली प्रेक्षकांची मनं

नम्रताच्या विनंतीला मान देत माधुरीने लॉलीचा प्रसिद्ध डायलॉग, “मेरी आँखों में झाँको!” अगदी खास अंदाजात म्हणून दाखवला. माधुरीच्या तोंडून लॉलीचा हा डायलॉग ऐकताच मंचावर एकच हास्यकल्लोळ झाला. माधुरीने लॉलीच्या शैलीत केलेल्या या नक्कलमुळे कार्यक्रमातील हा क्षण विशेष रंगतदार ठरला.

आपल्या आवडत्या अभिनेत्रीने साकारलेल्या या मजेशीर अंदाजामुळे नम्रताही भारावून गेली. ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागातील हा खास क्षण प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

Ramayana: थिएटरनंतर ‘रामायण’ घरबसल्या पाहता येणार; नमित मल्होत्रा आणि ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मची ऐतिहासिक भागीदारी

कशी तयार झाली नम्रता संभेरावची ‘लॉली’?

याच कार्यक्रमात नम्रता संभेरावने ‘लॉली’ हे लोकप्रिय पात्र कसे साकारले, यामागची गोष्टही सांगितली. नम्रता म्हणाली की, ती लालबागमधील एका चाळीत लहानाची मोठी झाली. लहानपणापासूनच तिने चाळीतील आणि आजूबाजूच्या महिलांचे वेगवेगळे हावभाव, बोलण्याच्या पद्धती आणि त्यांची देहबोली जवळून पाहिली होती. या निरीक्षणांचा उपयोग तिला लॉली हे पात्र साकारताना झाला.

लॉलीची हेअरस्टाईल स्वतः ठरवल्याचेही नम्रताने सांगितले. हे पात्र इतरांपेक्षा वेगळे दिसावे, अशी तिची इच्छा होती. लॉली थोडेफार इंग्रजी बोलते; मात्र आपण अतिशय उत्तम इंग्रजी बोलतो, असा तिचा ठाम आत्मविश्वास असतो. अशा अनेक छोट्या गोष्टी एकत्र करून, त्यांना थोडे अतिशयोक्त स्वरूप देत हे अनोखे पात्र तयार झाल्याचे नम्रताने स्पष्ट केले.

‘कोण होणार करोडपती’ कधी आणि कुठे पाहाल?

माधुरी दीक्षितचे सूत्रसंचालन, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची धमाल आणि नम्रता संभेरावच्या ‘लॉली’ची खास झलक यामुळे ‘कोण होणार करोडपती’चा आगामी भाग मनोरंजक ठरणार आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव्हवर पाहता येईल.

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी

Web Title: Madhuri dixit lolly mimicry kon honaar crorepati show viral video ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • entertainment
  • madhuri dixit
  • marathi show

संबंधित बातम्या

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?
1

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी
2

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी

Ramayana: थिएटरनंतर ‘रामायण’ घरबसल्या पाहता येणार; नमित मल्होत्रा आणि ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मची ऐतिहासिक भागीदारी
3

Ramayana: थिएटरनंतर ‘रामायण’ घरबसल्या पाहता येणार; नमित मल्होत्रा आणि ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मची ऐतिहासिक भागीदारी

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियापासून घेतला ब्रेक? प्रकृतीबाबत पोस्ट करत चाहत्यांची मागितली माफी
4

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियापासून घेतला ब्रेक? प्रकृतीबाबत पोस्ट करत चाहत्यांची मागितली माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.