(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. या चित्रपटासोबतच बॉलीवूड स्टार हृतिक रोशनचा ‘वॉर २’ देखील प्रदर्शित होणार आहे. दोन्ही मोठे चित्रपट थिएटरमध्ये एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहेत. प्रेक्षकही दोन गटात विभागले गेले आहेत. काही ‘वॉर २’ ची वाट पाहत आहेत तर काही ‘कुली’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच दोन्ही चित्रपटांच्या ॲडव्हान्स बुकिंगचे ताजे आकडेही समोर आले आहेत. या आकड्यांमध्ये दोन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहे. तसेच, या दोन्ही चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोणता चित्रपट पुढे आहे जाणून घेऊयात.
‘कुली’ने रिलीज होण्यापूर्वी केले एवढे कलेक्शन
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटाने निर्मात्यांना श्रीमंत केले आहे. आतापर्यंत चित्रपटाची ९ लाख ३८ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाचे ७,४२५ शो बुक झाले आहेत. चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच २०.३६ कोटींचा व्यवसाय केला आहे. ब्लॉक सीट्ससह, हा आकडा २६.९१ कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. मुंबईत ५०.७६ लाख आणि दिल्लीत २०.५८ लाखांची कमाई झाली आहे.
‘वॉर २’ चे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन
हृतिक रोशनचा चित्रपट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा मागे आहे. आतापर्यंत या चित्रपटाची १ लाख ३१ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाचे ८,६६३ शो बुक झाले आहेत. ब्लॉक सीट्ससह, या चित्रपटाने ८.७ कोटींची कमाई केली आहे. तर, महाराष्ट्रात ८७.९४ लाख, दिल्लीत ६८.१५ लाख आणि उत्तर प्रदेशात २९.०४ लाखांची कमाई केली आहे.
दोन्ही चित्रपटांमधील कलाकार
चित्रपटांमधील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, ‘वॉर २’ मध्ये हृतिक रोशनसह कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने यात खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘कुली’ मध्ये रजनीकांतसह नागार्जुन अक्किनेनी, आमिर खान, श्रुती हासन आणि सौबिन शाहीर मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.