
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘निशांची’ चित्रपटाचा OTT प्रवास सुरू झाला आहे. पार्ट 1 आणि 2 दोन्ही भाग १४ नोव्हेंबरपासून भारतात तसेच जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना दुहेरी नाट्य, ॲक्शन आणि भावनांचा पूर्ण अनुभव घेता येणार आहे.
अजय राय आणि रंजन सिंग यांच्या जार पिक्चर्स या बॅनरखाली आणि फ्लिप फिल्म्सच्या सहनिर्मितीत तयार झालेला ‘निशांची’ चित्रपट अनुराग कश्यप दिग्दर्शित आहे. या चित्रपटाचे लेखन प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी केले आहे. चित्रपटात पदार्पण करताना ऐश्वर्य ठाकरे दुहेरी भूमिकेत दिसतात, तर त्यांच्यासोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झीशान अय्यूब, कुमुद मिश्रा आणि विनीत कुमार सिंग यांची महत्वाची भूमिका आहे.
चित्रपट दोन भागांत जुळ्या भावांची कथा सांगतो, ज्यांचा चेहरा सारखा असला तरी मूल्यव्यवस्था पूर्णपणे भिन्न आहे. बंधुत्व, विश्वासघात, प्रेम आणि मुक्ती यांची गुन्हे-जगाच्या पार्श्वभूमीवर उभी केलेली गाथा प्रेक्षकांना थरारक अनुभव देते. पार्ट १ मध्ये मंजीरी (मोनिका पंवार) आणि जुळे मुले बबलू आणि डबलू (ऐश्वर्य ठाकरे) यांची ओळख होते. शांत आणि संभ्रमित डबलू, तर जाज्वल्य आणि महत्त्वाकांक्षी बबलू अंबिका प्रसाद (कुमुद मिश्रा) यांच्या गँगमध्ये अडकतो आणि रिंकू (वेदिका पिंटो) वर प्रेम झाल्यानंतर त्याचे आयुष्य नियंत्रणाबाहेर जाते.
पार्ट २ मध्ये बबलू मुक्तीच्या शोधात असतो, परंतु पुन्हा अंबिकाच्या जगात खेचला जातो आणि शेवटी दबलेल्या सत्यांचा उद्रेक होऊन न्यायाची निर्णायक परिणती घडते. दमदार संवाद, प्रभावी संगीत आणि अनुराग कश्यप यांची खास कथनशैली या चित्रपटाला तीव्र आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव बनवते.
प्राइम व्हिडिओ इंडिया चे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स निखिल मधोक म्हणाले,“दोन भागांचा चित्रपट असलेला निशांची आम्ही जगभरातील प्रेक्षकांसमोर आणत आहोत याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. दोन्ही भाग एकत्र प्रदर्शित होत असल्याने, प्रेक्षकांना संपूर्ण कथा एकाच वेळी अनुभवता येईल.तीव्र, भावनांनी भरलेली आणि अनेक स्तरांनी गुंफलेली अशी ही कथा अनुराग कश्यप यांच्या निर्भीड आणि अनफिल्टर्ड फिल्ममेकिंग शैलीचे उत्तम उदाहरण आहे. अनुराग आणि त्यांच्या टीमसोबतची आमची ही सहप्रवास खूपच समृद्ध करणारी होती. प्रभावी अभिनय, मनाला भिडणारे संगीत आणि पारंपरिक देसी रंग यांनी सजलेला निशांची १४ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत असताना भारत आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.”
मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल
दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले,“निशांची ही अशी कथा आहे ज्यात मला हिंदी सिनेमाबद्दलचे माझे सगळे प्रेम सापडते.भावना, तीव्रता, गोंधळ, ॲक्शन आणि भरपूर ड्रामा. ही माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक फिल्म आहे आणि त्यामुळे लेखनापासून शूटिंगपर्यंत आणि पात्रनिर्मितीपर्यंत सर्वकाही अपार आवेश आणि प्रामाणिकपणे घडवले गेले आहे. ही एक कौटुंबिक गाथा आहे. पार्ट 1 गुन्हे-जग आणि आपल्याला परिभाषित करणाऱ्या निवडींबद्दल सखोल पडताळणी करते, तर पार्ट 2 शिक्षा, मुक्ती आणि त्या निवडींसाठी मोजावी लागणारी किंमत याबद्दल आहे. माझ्या कलाकार, टीम आणि Amazon MGM Studios India चे मी मनापासून आभार मानतो. दोन्ही भाग एकत्र अनुभवण्यासाठी मी भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांची आतुरतेने वाट पाहत आहे, जेव्हा निशांची १४ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.”
Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा