Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निशाणची’च्या ट्रेलर मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, ऐश्वर्य ठाकरेने बाप्पाच्या चरणी मानले आभार!

ऐश्वर्य ठाकरेने नुकतेच बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेत्याच्या 'निशाणची' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेत्याने यासाठी बाप्पाच्या चरणी आभार मानले.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 05, 2025 | 04:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐश्वर्य ठाकरेने घेतले बाप्पाचे दर्शन
  • ‘निशाणची’ चित्रपटाच्या यशासाठी घेतला आशीर्वाद
  • ‘निशाणची’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

यंदाच्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘निशाणची’ आता प्रदर्शानाच्या तयारीत आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांसारखे कल्ट क्लासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट आहे. यात ऐश्वर्य ठाकरेने अभिनयात पदार्पण केले आहे. अभिनेत्याच्या जोडीला वेदिका पिंटो देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. नव्या जोडीच्या केमिस्ट्रीने आणि ऐश्वर्यच्या पदार्पणामुळे आधीपासूनच चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कालच या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. कथानकातील गुंतवणूक, दमदार संवाद, आणि मुख्य कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामध्ये दोन जुळ्या भावांची कथा पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये प्रेमकथा देखील पाहायला मिळणार आहे. तगड्या स्टारकास्टसह हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीस; कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका!

या ट्रेलरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, ऐश्वर्य ठाकरे, त्यांची आई स्मिता ठाकरे आणि सहकलाकार वेदिका पिंटो हे तिघेही मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यावेळी या तिघांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आगामी चित्रपटासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत, चित्रपटाभोवतीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘निशाणची’ च्या ट्रेलरमध्ये ऐश्वर्य ठाकरे हा बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे, हे दोघेही दिसायला सारखे पण विचारांनी आणि स्वभावाने संपूर्ण भिन्न आहेत. २००० च्या दशकातल्या उत्तर प्रदेशातील छोट्या शहरात घडणारी ही कथा प्रेम, संघर्ष, द्वेष आणि गुन्हेगारीने भरलेली आहे. बबलूचं रिंकूवरील प्रेम असो किंवा डबलूचा अडथळा निर्माण करणारा स्वभाव ट्रेलरमधून अ‍ॅक्शन, इमोशन आणि थराराचा भरपूर अनुभव पाहायला मिळतो आहे.

फसवणूक प्रकरणात शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, मुंबई पोलिसांनी बजावले LOC समन्स

हा चित्रपट अनुराग कश्यप यांच्या खऱ्या आणि थेट शैलीतील कथाकथनातला आणखी एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. चित्रपटात ऐश्वर्य आणि वेदिका यांच्यासह मोनीका पंवार,मोहम्मद झिशान अय्युब, आणि कुमुद मिश्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अजय राय आणि रंजन सिंग यांच्या Jar Pictures आणि Flip Films यांच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली आहे. कथालेखन प्रसून मिश्रा, रंजन चंदेल, आणि अनुराग कश्यप यांनी मिळून केले आहे. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Web Title: Aishwarya thackeray visited lalbaugcha raja for upcoming film nishaanchi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

“मी कायदेशीर कारवाई करेन…”, अखेर माही विजने पती जय भानुशाली सोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांवर सोडले मौन
1

“मी कायदेशीर कारवाई करेन…”, अखेर माही विजने पती जय भानुशाली सोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांवर सोडले मौन

योगिता चव्हाणनंतर आणखी एक टीव्ही अभिनेत्री घेणार डिवोर्स? लग्नाच्या 8 वर्षांनी घेतला मोठा निर्णय
2

योगिता चव्हाणनंतर आणखी एक टीव्ही अभिनेत्री घेणार डिवोर्स? लग्नाच्या 8 वर्षांनी घेतला मोठा निर्णय

‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ लवकरच होणार बंद? स्मृती इराणीच्या मालिकेबाबत समोर आली मोठी बातमी
3

‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ लवकरच होणार बंद? स्मृती इराणीच्या मालिकेबाबत समोर आली मोठी बातमी

बिग बींच्या पायाला स्पर्श केल्यामुळे दिलजीतला खलिस्तानी गटाने धमकावले; गायकाने आगामी कॉन्सर्ट केला रद्द
4

बिग बींच्या पायाला स्पर्श केल्यामुळे दिलजीतला खलिस्तानी गटाने धमकावले; गायकाने आगामी कॉन्सर्ट केला रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.