(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांना पोटधरून हसवणारा ‘साडे माडे तीन’ चित्रपट अजूनही लक्षात आहे. या चित्रपटाने त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे जो अजूनही या चित्रपटावर भरभरून प्रेम करतो. तसेच आता या चित्रपटामधील कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि त्यांचे किस्से प्रेक्षकांना खूप आवडले. आता बऱ्याच वर्षांनी हे कुरळे ब्रदर्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटही येत आहे. ‘साडे माडे तीन’ चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर केले आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे सगळे कलाकार कुरळे ब्रदर्स त्यांच्या भूमिकेत प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरवरील सगळ्यांच्या चेहऱ्यावरील मजेदार भाव आणि त्यांचा भन्नाट लूक पाहून पुन्हा एकदा हास्याचा डबल धमाका होणार असल्याचे समजले आहे. या धमाल चौकडीत रिंकू राजगुरूचाही हसताना फोटो दिसत आहे.
Bigg Boss 19 : देव पावला…अमाल मलिक झाला जागा! थेट फरहानाशी भिडला, म्हणाला – तू काय बसीरची…
तसेच, आणखी मजेदार गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक मराठी अभिनेता अंकुश चौधरी स्वतः करत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल बोलताना अंकुश म्हणाला, ‘या वेळची जबाबदारी जास्त मोठी होती. पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे.’ असे अंकुशचे म्हणणे आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स अंतर्गत हा चित्रपट बनवला गेला आहे. अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. यशराज टिळेकर आणि सौरभ लालवानी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच, स्मिथ पीटर तेलगोटे सहयोगी निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते आहेत.
Baaghi 4 Review: टायगरचा दमदार कमबॅक, संजय दत्तचा खतरनाक अंदाज; युजर्स म्हणाले – ‘मास एंटरटेनर’
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चे कथा लेखन अंकुश चौधरीने केले आहे. तर, पटकथा आणि चित्रपटामधील संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर हे सगळे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.