Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पद्मभूषण अनुपम खेर यांचा मोठा उपक्रम; मुंबईनंतर दिल्लीमध्ये ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’चे उद्घाटन

बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर नेहमीच त्यांच्या कामामुळे अनेकदा चर्चेत आलेले आहेत. आता अशातच अभिनेत्याने नवा उपक्रम सुरु केला असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याने दिल्लीमध्ये अ‍ॅक्टिंग स्कूल सुरु केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 06, 2026 | 02:14 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • पद्मभूषण अनुपम खेर यांचा मोठा उपक्रम
  • मुंबईनंतर दिल्लीमध्ये ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’चे उद्घाटन
  • ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’ची कधी झाली स्थापना
 

पद्मभूषण पुरस्कार विजेते अभिनेते अनुपम खेर यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या प्रीमियर अ‍ॅक्टिंग स्कूल ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’चे नवीन सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर नवी दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव येथे कार्यरत असून, मुंबईतील मुख्य केंद्रांनंतर स्कूलच्या विस्ताराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना आता जागतिक दर्जाचे अभिनय शिक्षण त्यांच्या स्वतःच्या शहरात घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई

‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’ची स्थापना २००५ साली अनुपम खेर यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या चित्रपट कलाकारांच्या नेतृत्वाखाली चालणारे हे जगातील एकमेव व्यावसायिक ड्रामा आणि अ‍ॅक्टिंग स्कूल आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात या संस्थेने भारतातील अनेक यशस्वी आणि विश्वासार्ह कलाकार घडवले असून, त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन दिले आहे. या स्कूलमधून प्रशिक्षण घेतलेल्या कलाकारांमध्ये दीपिका पदुकोण, हृतिक रोशन, वरुण धवन, कियारा अडवाणी, शुभांगी दत्त, अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा, ईशा गुप्ता, गौहर खान यांसारख्या अनेक नामवंतांचा समावेश आहे.

आपल्या स्कूलच्या विस्ताराबाबत बोलताना अनुपम खेर म्हणाले, “आम्हाला ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’ नवी दिल्लीमध्ये सुरू करताना अत्यंत आनंद होत आहे. हे शहर सर्जनशील ऊर्जा आणि कलेबद्दलच्या उत्कटतेने परिपूर्ण आहे. हे सेंटर त्या उदयोन्मुख कलाकारांसाठी नवीन संधी निर्माण करेल, जे व्यावसायिक अनुभवावर आधारित दर्जेदार प्रशिक्षण घेऊ इच्छितात आणि इंडस्ट्रीचा सखोल अनुभव असलेल्या प्रशिक्षकांकडून शिकू इच्छितात.”

“Bhagam Bhag 2” मधून गोविंदा आणि प्रियदर्शन पडले बाहेर; ‘हा’ बॉलीवूड अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

नवी दिल्लीतील या सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी ते म्हणाले, “नवी दिल्लीमध्ये ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’ची सुरुवात ही केवळ एका नवीन सेंटरचे उद्घाटन नाही, तर अनेक सर्जनशील प्रवासांची सुरुवात आहे. अशा संस्था शिस्त, प्रामाणिकपणा आणि कलात्मक धैर्य वाढवण्यात मोलाची भूमिका बजावतात.”

नवी दिल्ली सेंटरमध्ये अनुभवी इंडस्ट्री ट्रेनर्सद्वारे विविध व्यावसायिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना समग्र अभ्यासक्रम दिला जाईल, जो आत्मशोध, अभिनयातील शिस्त आणि इंडस्ट्रीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर केंद्रित असेल. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. त्यानंतर ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’ची इन-हाउस कास्टिंग टीम विद्यार्थ्यांना क्लासरूमपासून सिल्व्हर स्क्रीनपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Anupam kher opens a new centre of his acting school actor prepares in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Anupam Kher
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.