(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. विनोदा बरोबर या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांची वेदनादायी कथा देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान आता या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या वेदनांची दिसणार गोष्ट
नुकत्याच रिलीज झालेल्या ३ मिनिट ५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये शेतकऱ्यांच्या वेदना दाखवण्यात आल्या आहेत. यावेळी ही कथा शेतकऱ्यांभोवती फिरताना दिसणार आहे. जिथे एक मोठा माणूस आहे, जो शेतकऱ्यांची जमीन बळकावत आहे. दुसरीकडे शेतकरी आहेत, जे त्यांची जमीन वाचवण्यासाठी जॉलीपर्यंत पोहोचतात. शेतकरी प्रथम अक्षय कुमारपर्यंत पोहोचतात, तर नंतर खेळ बदलतो. ट्रेलर पाहून असे दिसते की जॉली १ म्हणजेच अर्शद वारसी शेतकऱ्यांचा खटला लढत आहे आणि शेतकऱ्यांचा वकील बनला आहे. अक्षय कुमार त्या मोठ्या माणसाचा म्हणजेच गजराज राव यांचा वकील आहे. गेल्या दोन चित्रपटांप्रमाणे यावेळीही कथेत विनोद आणि मजेसह भावनिक अँगल आणि सामाजिक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात नवा राडा, मृदुल आणि शाहबाज एकमेकांना भिडले; नक्की घरात काय घडले?
गजराज राव वेगळ्या अंदाजात दिसले
ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या उर्वरित कलाकारांची झलकही दिसते. ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये गजराज राव पुन्हा एकदा पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसले आहे. ते चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. हुमा कुरेशी आणि अमृता राव त्यांच्या मागील भूमिकांमध्ये दिसतील. हुमा अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारत आहे, तर अमृता अर्शद वारसीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. याशिवाय यावेळी सीमा बिस्वास देखील एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी व्यतिरिक्त, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव आणि संजय मिश्रा हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी त्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
दोन्ही जॉली पहिल्यांदाच दिसणार एकत्र
‘जॉली एलएलबी ३’ हा या कोर्टरूम ड्रामा फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. यापूर्वी चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या भागात अर्शद वारसीने जॉलीची भूमिका केली होती, जो मेरठचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या भागात ‘जॉली एलएलबी २’ मध्ये अक्षय कुमार जॉलीची भूमिका साकारत होता. हा जॉली कानपूरचा आहे. आता, चित्रपटाच्या तिसऱ्या भागात, दोन्ही जॉली पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.