Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमार एका रुपयात विमानाने प्रवास करायला निघाला, ‘सरफिरा’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'सरफिरा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार कमी किमतीत विमानसेवा सुरू करण्यासाठी संघर्ष करताना या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 19, 2024 | 11:53 AM
Akshay kumar (फोटो सौजन्य-Instagram)

Akshay kumar (फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड इंडस्ट्रीचा ॲक्शन स्टार अक्षय कुमार एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. परंतु आता अक्षय कुमारचा 2024 चा दुसरा चित्रपट ‘सरफिरा’ रिलीजसाठी सज्ज आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला असून, ‘सरफिरा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार कमी किमतीची एअरलाइन सुरू करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. ‘सरफिरा’ हा चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने शेअर केला ‘सरफिरा’ चित्रपटाचा ट्रेलर
इंडस्ट्रीचा सुपरस्टार अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘सरफिरा’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबत अक्षय कुमारने लिहिले आहे की, ‘स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. सरफिरा ही अशाच एका स्वप्नाची कथा आहे. सरफिरा 12 तारखेला 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार (वीर म्हात्रे) एका गावातून येतो आणि स्वस्त विमानसेवा सुरू करण्याचा विचार करतो असे दाखवण्यात आले आहे. यानंतर तो इकडे-तिकडे भटकतो आणि लोकांना फक्त एक रुपयात विमानाने प्रवास करून देण्यासाठी धडपडताना करताना या चित्रपटामध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती मिळत आहे आणि त्याचे चाहते चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

 

‘सरफिरा’ चित्रपटाची कथा
अक्षय कुमारचा चित्रपट ‘सरफिरा’ हा नॅशनल अवॉर्ड विजेत्या साऊथ चित्रपट सूरराई पोत्रूचा रिमेक आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले असून मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाची कथा कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. कॅप्टन जीआर गोपीनाथ यांनी एअर डेक्कन विमानसेवा सुरू केली. ‘सरफिरा’ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त राधिका मदन आणि परेश रावल सारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Akshay kumar sets out to travel by plane for one rupee sarafira trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • Akshay Kumar

संबंधित बातम्या

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स; दिले हजर राहण्याचे आदेश
1

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स; दिले हजर राहण्याचे आदेश

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
2

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज
3

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
4

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.