(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने अक्षयचे चाहते आणि इंडस्ट्रीतील लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. आता स्वतः अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. एक खास फोटो शेअर करताना अक्षयने त्याच्या कारकिर्दीचा आणि चित्रपटांचा उल्लेख केला आहे आणि चाहत्यांचे आभार मानणारी एक खास पोस्टही लिहिली आहे. अक्षयने सोशल मीडियावर काय शेअर केले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
अक्षयने शेअर केली खास पोस्ट
अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अक्षयचा अलिकडचा फोटो आहे आणि त्याच्या मागे त्याच्या कारकिर्दीत साकारलेले वेगवेगळे पात्र दिसत आहेत. यासोबतच अक्षयने कॅप्शनमध्ये एक लांबलचक नोट देखील लिहिली आहे. अक्षयने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘५८ वर्षे कठोर परिश्रम, या इंडस्ट्रीमध्ये ३४ वर्षे, १५० हून अधिक चित्रपट आणि बरेच काही. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी तिकीटे खरेदी केली, ज्यांनी मला साइन केले, मला प्रोड्यूस केले, मला दिग्दर्शित केले आणि मार्गदर्शन केले त्या सर्वांना, हा प्रवास जितका तुमचा आहे तितकाच माझा आहे.’
BIGG BOSS 19 : मैत्री तुटली? अमाल मलिक… जीशान आणि बसीरशी भिडला! पहा PROMO
पुढे लिहिले, ‘तुमच्या सर्व चांगल्या कृतींसाठी, निःशर्त पाठिंब्यासाठी आणि प्रोत्साहनदायक शब्दांसाठी मी तुमचे खूप आभार मनात आहे. तुमच्यामुळे मी येथे आहे तुमच्याशिवाय मी काहीच नाही, माझा वाढदिवस माझ्यावर अजूनही विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना समर्पित आहे. तुम्हा सर्वांचे आभार आणि सर्वांना प्रेम आणि प्रार्थना. तुमचा अक्षय.’ शेवटी, अक्षयने जय महाकालसह त्याची पोस्ट पूर्ण केली आहे.
राहुल नंदा यांचे खास पोस्ट तयार केल्याबद्दल आभार
अक्षयने राहुल नंदा यांचे खास पोस्ट तयार केल्याबद्दल आभार मानले. अभिनेत्याने पुढे लिहिले की, ‘जगातील माझ्या आवडत्या लोकांसाठी, माझ्या चाहत्यांसाठी माझ्या आयुष्यातील काम टिपल्याबद्दल अत्यंत प्रतिभावान राहुल नंदा यांचे खूप खूप आभार.’ अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Raj Kundra: शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स; ‘या’ तारखेला राहणार हजर
‘जॉली एलएलबी ३’ च्या प्रदर्शनाची वाट पाहत असलेला अक्षय
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अक्षय कुमार लवकरच त्याच्या आगामी ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटात दिसणार आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अर्शद वारसी, हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्ला यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कोर्टरूम ड्रामा फ्रँचायझीचा हा तिसरा भाग १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.