
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांचा चित्रपट “धुरंधर” बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमवत आहे. यशाचा आनंद घेत असलेल्या अक्षयने “दृश्यम ३” चित्रपट सोडल्याचे वृत्त समोर आले आहे. असे म्हटले जात आहे की, निर्मात्यांशी असलेल्या सर्जनशील मतभेदांमुळे आणि आर्थिक मतभेदांमुळे अभिनेत्याने चित्रपट सोडला आहे. तसेच अभिनेत्याने धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर त्याची फी वाढवली आहे.
“बॉलीवूड मशीन” च्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, “धुरंधर” चित्रपटाच्या जबरदस्त बॉक्स ऑफिस यशानंतर अक्षय खन्नाने त्याच्या मानधनात लक्षणीय वाढ करण्याची मागणी केली होती. आर्थिक बाबींव्यतिरिक्त, अभिनेत्याने “दृश्यम ३” चित्रपटाच्या त्याच्या ऑन-स्क्रीन लूकमध्येही लक्षणीय बदल करण्याची मागणी केली होती. या मागण्यांमुळे मतभेद निर्माण झाले आणि शेवटी तो या प्रकल्पातून बाहेर पडला.
निर्मात्यांमध्ये बोलणे सुरु आहे
सूत्रांनुसार, अक्षय खन्ना आणि निर्मात्यांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे आणि त्याच्या बाहेर पडण्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. अभिनेता या प्रकल्पात परत येईल की निर्माते त्याची जागा दुसऱ्या कलाकाराला देतील हे सध्या अद्यापही स्पष्ट झालेले नाही आहे.
“धुरंधर” हा अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. यात रणवीर सिंग, सारा अली खान, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्यासह इतर कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तीन आठवड्यांनंतरही हा चित्रपट हिट ठरत आहे. चित्रपटाने १७ दिवसांत भारतात ५५५ कोटी आणि जगभरात ८४७ कोटी रुपयांचा गल्ला पार केला.
“धुरंधर २” कधी होणार प्रदर्शित?
पहिल्या भागाच्या शेवटी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली. “धुरंधर २” १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. तसेच ‘दृश्यम’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चाहते अक्षय खन्नाला ‘दृश्यम ३’ मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.