
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोड़पति 17’ मध्ये दिसत आहेत आणि जोरदार चर्चेत आहेत. ते सोशल मीडियावरही लोकांचे लक्ष वेधण्यात मागे राहत नाहीत. रात्री उशिरा केलेले त्यांचे ट्विट्स लोकांचे डोके फिरवतात. पुन्हा एकदा त्यांनी काही असे ट्विट केले आहे, ज्यावर यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये अतरंगी प्रतिक्रिया देत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी 26 ऑक्टोबर रोजी रात्री २ ट्विट केलं होते जे जोरदार व्हायरल होत आहेत. अनेकांनी या ट्विटवर मजेशीर कमेंटस देखील केल्या आहेत. त्यांनी रात्री 11:55 वाजता ट्विट केले. , “T 5545 – जे दातात अडकलेला, ते तोंडाने चांगले काढू शकतो!” आणि 20 मिनिटांनी रात्री 12:15 वाजता एका विचित्र फोटोसह लिहिले, “T 5545(i) – जपानला जायचं होतं, पोहोचलो MARS, तारा रा टंटना टन टन।”. या दोन्ही ट्विट्सवर लोक प्रतिक्रिया देत आहेत आणि विनोद करत आहेत. लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत.
Sachin Chandwade :अभिनेता सचिन चांदवडेची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना उचलं टोकाचं पाऊल
T 5545 – जो दांत में फ़सा, उसे ज़बान बेहतर निकाल सकती है ! — Amitabh Bachchan (@SrBachchan) October 26, 2025
अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या पोस्टवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले, “सर, म्हातारपणात नॉनवेज खाऊ नका. ते दातात अडकतात आणि तोंडाने काढणं अवघड असतं.” दुसऱ्या युजरने लिहिले, “सरजी, तोंड तर दातालाही काढू शकतं.” एका युजरने मजेशीरपणे म्हटले, “कोंबडा खाल्यानंतर माझा मित्रही हेच बोलतो,” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ”आपले नकली दात असतील, काढून स्वच्छ करा.” या कमेंट्समुळे लोक जोरदार हसत आहेत आणि अमिताभ बच्चन यांच्या ट्विट्सवर चांगला गदारोळ उडाला आहे.
T 5545(i) – जाना था जापान पहुँच गये – MARS, तरा रा टनटना टन टन 🎶🎶 pic.twitter.com/4yYRsBDu77 — Amitabh Bachchan (@SrBachchan) October 26, 2025
अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या पोस्टवरही लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलं, “जया आंटीला विचारलं का तुम्ही?” दुसऱ्या एका युजरने प्रश्न विचारला, “असा कोणता नशा करतोय सर, ट्विट करण्यापूर्वी?”