
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की त्याची चाहत्यांप्रती असलेली बांधिलकी कोणत्याही परिस्थितीपेक्षा मोठी आहे. नुकताच ISPL सीझन 3साठी सूरतला पोहोचलेल्या सलमान खानने हा कार्यक्रम केवळ एक क्रीडा स्पर्धा न ठेवता, चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय फॅन-फेस्टमध्ये रूपांतरित केला.
सलमानच्या उपस्थितीमुळे मैदानात एक वेगळाच उत्साह भरला. चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्याच्या जवळ पोहोचण्याची संधी मिळवण्यासाठी सर्वत्र गर्दी दिसली. सलमानने चाहत्यांसोबत संवाद साधताना त्यांच्या प्रेमाला मान दिला आणि त्यांच्या प्रत्येक क्षणाला महत्व दिले.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांनंतरही त्यांनी हा धोका पत्करला. सलमान शांत आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होतेच, पण त्यांनी चाहत्यांकडे हात हलवला, जवळ जाऊन संवाद साधला आणि क्रिकेटप्रेमींसाठी टेनिस बॉल्सवर ऑटोग्राफही दिले. हे क्षण स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहत्यांना भावूक करून गेले.
सलमानच्या या वागण्यामुळे चाहत्यांच्या मनात त्याची प्रतिमा आणखी दृढ झाली आहे. त्यांच्या चाहत्यांशी असलेला हा विशेष कनेक्शन आणि प्रेम, सलमानच्या करिअरमधील एक महत्त्वाचा भाग असल्याचं स्पष्ट होतं. या कार्यक्रमामुळे ISPL सीझन 3 च्या वातावरणातही एक वेगळाच रंग भरला आणि कार्यक्रम अधिकच आकर्षक बनला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खान सध्या त्यांच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटामुळेही जोरदार चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटातील मातृभूमी हे लेटेस्ट गाणं रिलीज झालं असून, चाहत्यांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि सोशल मीडियावर ते वेगाने ट्रेंड करत आहे.
दमदार संगीत आणि सलमानची स्क्रीन प्रेझेन्स यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे. बॅटल ऑफ गलवान हा चित्रपट सलमा खान यांनी सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली प्रोड्यूस केला असून, दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केलं आहे.
चित्रपटाचं संगीत सलमान खान फिल्म्स म्युझिक लेबलअंतर्गत रिलीज झालं असून, सोनी म्युझिक इंडिया ही त्याची अधिकृत म्युझिक डिस्ट्रीब्यूशन पार्टनर आहे. शौर्य, बलिदान आणि जिद्दीची कथा मांडणाऱ्या या चित्रपटात चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.