Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बींचे ‘ते’ ब्लॉग, चाहत्यांची चिंता ढगात! रुग्णालयातून घरी परतताच अमिताभ बच्चन यांनी दिली महत्वाची माहिती

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच केलेल्या ब्लॉग पोस्टमधून आपल्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून उपचारासाठी त्यांना ICUमध्येही ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कोणत्या आजारासाठी शस्त्रक्रिया झाली याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 21, 2026 | 09:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या अलीकडील ब्लॉगमध्ये प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि काही काळ त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. मात्र, नेमका कोणता आजार किंवा कोणती शस्त्रक्रिया झाली, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.

Purva Kaushik : तरुणांचे आंदोलन पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर! ढसाढसा रडत म्हणाली “लोकशाही असलेल्या…”

ब्लॉगमध्ये बिग बी यांनी रुग्णालयातून घरी परतल्यानंतरचा काळच सर्वाधिक कठीण असल्याचे सांगितले. शारीरिक त्रास, मानसिक ताण आणि दैनंदिन जीवनात पुन्हा रुळण्याचा प्रवास सोपा नसल्याचे त्यांनी नमूद केले. उपचारादरम्यान डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेसाठी त्यांनी मनापासून आभारही मानले.

आपल्या आरोग्याबाबत बोलताना अमिताभ बच्चन यांनी आयुष्यातील संघर्षांवरही भाष्य केले. यशाच्या शिखरावर असतानाही कधीतरी पराभवाचा सामना करावा लागतो. अशा वेळी संकटांवर मात करून पुढे जाणारेच खरे विजेते ठरतात, असे त्यांनी लिहिले. काही लोक आव्हानांना धैर्याने सामोरे जातात, तर काही भूतकाळातील यशात रमून राहतात. प्रत्येक व्यक्तीची ही स्वतःची निवड असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमिताभ यांच्या या ब्लॉगनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या सकारात्मक विचारसरणीचे आणि जिद्दीचेही अनेकांनी कौतुक केले.

Saurabh Gokhale : अभिनेत्याने केली सरकारची पाठराखण? “मी हिंदुविरोधी गोष्टींना…” सौरभ गोखलेचे ‘ते’ विधान आले चर्चेत

दरम्यान, कामाच्या आघाडीवर अमिताभ बच्चन नुकतेच ‘कल्की 2898 AD: Part 2’ या चित्रपटात झळकले होते. तसेच ते लवकरच ‘कौन बनेगा करोडपती 18’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नियमित ब्लॉगच्या माध्यमातून ते आपल्या आयुष्यातील अनुभव, विचार आणि घडामोडी चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात.

Web Title: Amitabh bachchan viral blog about his health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • amitabh bacchan
  • amitabh bachchan
  • health

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan: FIFA मधील पराभवानंतर मेस्सी भावूक; अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने जिंकली चाहत्यांची मनं
1

Amitabh Bachchan: FIFA मधील पराभवानंतर मेस्सी भावूक; अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने जिंकली चाहत्यांची मनं

Paresh Rawal : “अमिताभ बच्चन यांनी आता…” अभिनेत्यांबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा
2

Paresh Rawal : “अमिताभ बच्चन यांनी आता…” अभिनेत्यांबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती 18’ची तारीख ठरली! यंदा गेममध्ये असणार मोठे बदल
3

Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती 18’ची तारीख ठरली! यंदा गेममध्ये असणार मोठे बदल

Amitabh Bachchan CA: कधीकाळी सांभाळायचे अमिताभ बच्चन यांचे अकाउंट; आज स्वतः 15000 कोटींचे मालक! कोण आहेत प्रेमचंद गोधा?
4

Amitabh Bachchan CA: कधीकाळी सांभाळायचे अमिताभ बच्चन यांचे अकाउंट; आज स्वतः 15000 कोटींचे मालक! कोण आहेत प्रेमचंद गोधा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.