Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझा श्रावणबाळ…’ अभिनेता प्रसाद जवादेच्या आईला झालं होतं कॅन्सरचं निदान, पत्नी अमृताने सांगितला ‘तो’ किस्सा

मराठी अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम अमृता देशमुखने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात पती प्रसाद जवादेसोबत हजेरी लावली. तिने प्रसादची एक वेगळी बाजू देखील शेअर केली. आणि हे ऐकताना सगळे भावुक होताना दिसले.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 08, 2025 | 12:05 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेता प्रसाद जवादेच्या आईला कॅन्सरचं निदान
  • पत्नी अमृताने प्रसादचे केले कौतुक
  • प्रसादच्या आईने म्हटले श्रावणबाळ
नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. हा सोहळा लवकरच प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहे. यादरम्यान झी मराठीवरील मालिकांच्या नॉमिनेशनचा सोहळा पार पडला. आता सोशल मीडियावर या सोहळ्यामधल्या काही क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी या पुरस्कार सोहळ्यमध्ये कलाकारांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तींनी देखील रंगमंचावर उपस्थिती लावली. यावेळी पारु मालिकेतल्या आदित्यने म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेने एक पुरस्कार जिंकला. तो स्वीकारताना त्याची पत्नी अमृता आणि आई दोघेही उपस्थित होत्या.

‘दिया और बाती हम’ फेम अलान कपूर आणि रविराने केले लग्न, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

पुरस्कार स्विकारतेवेळी प्रसाद जवादेची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुखने डोळे पाणवणारा किस्सा शेअर केला. प्रसादच्या आईला गेल्या दिवाळीत कॅन्सरचे निदान झाले होते. यावेळी अभिनेत्याने शूटिंग, घर, आईची तब्येत, बायकोसाठी वेळ या सर्व गोष्टी कश्या उत्तम पार पडल्या याबद्दल अमृताने अभिमानाने सांगितले आणि त्याचे कौतुक केले. पत्नी अमृता आणि आई या दोघीनाही त्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.

 

पुरस्कारवेळी अमृता म्हणाली की, ‘गेल्यावर्षी दिवाळीमध्ये काकूंना कॅन्सरचे पुन्हा निदान झालं आहे हे आम्हाला कळलं. काकूंचं स्वप्न होतं की प्रसादला मला पुन्हा एकदा रोज टीव्हीवर किंवा एखाद्या डेली सोप मध्ये पाहायचं आहे. एकीकडे पारूचं शूट सुरू होतं आणि दुसरीकडे आम्ही त्यांची ट्रीटमेंट लगेचच सुरू केली. प्रसादला मी पाहिलंय म्हणजे जी व्यक्ती कधीतरी अतिशय बालिश वाटू शकते, तो आधी पटकन बोलतो आणि नंतर विचार करतो मग त्याला त्याचा त्रास होतो… असे त्याचे खूप पैलू आहेत. पण जेव्हा मी त्याला काकूंचाच वडील झालेलं पाहिलं तेव्हा मला त्याची एक वेगळी बाजू दिसली.’ असे अमृता म्हणाली.

मिलिंद सोमणने केले पत्नी अंकिताचे कौतुक, आयर्नमॅन पूर्ण करणारी ठरली पहिली आसामी महिला

पुढे प्रसाद जवादेची आई म्हणाली की, ‘माझ्या आधी तर हॉस्पिटलमध्येच सगळ्यांनी त्याचं नाव श्रावण बाळ पाडलं आहे. आणि खरोखरच तो श्रावण बाळासारखा आहे. आधुनिक काळातला तो श्रावण बाळ आहे! म्हणजे त्याला जे पारितोषिक मिळालं आहे ते तंतोतंत खरं आहे.’ असं म्हणून आईने देखील मुलाचे कौतुक केले.

आई आणि पत्नी बोलत असताना प्रसादचे डोळे पाणावले. प्रसादच्या आईच्या सांगण्यावरुन त्याला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ मुलाचा अवॉर्ड मिळाल्याचे जाणवते. प्रसाद आणि अमृताबद्दल बोलायचे झाल्यास बिग बॉस मराठीमध्ये दोघांची जोडी जुळली. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दोघांनी साखरपुडा झाल्याचे जाहिर केले. आणि काही काळाने या दोघांनी लग्न केले आणि चाहत्यांना खुश केले.

Web Title: Amruta deshmukh share how prasad javade manage paaru shoot and take care of his cancerr patient mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • zee marathi

संबंधित बातम्या

४६ व्या वर्षीही अविवाहित? भोचक प्रश्नांबाबत मुक्ता बर्वे स्पष्टच बोलली, म्हणाली ‘वैयक्तिक आयुष्याबद्दल…’
1

४६ व्या वर्षीही अविवाहित? भोचक प्रश्नांबाबत मुक्ता बर्वे स्पष्टच बोलली, म्हणाली ‘वैयक्तिक आयुष्याबद्दल…’

मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth
2

मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS
3

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

zee Marathi Serial: ‘कमळी’मध्ये प्रेम, कट आणि ड्रामा, ऋषी कमळीसमोर आपलं प्रेम व्यक्त करेल?
4

zee Marathi Serial: ‘कमळी’मध्ये प्रेम, कट आणि ड्रामा, ऋषी कमळीसमोर आपलं प्रेम व्यक्त करेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.