
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
नुकताच OTT वर प्रीमियर झालेला अपारशक्ती खुराणा स्टारर ‘बर्लिन’ प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून प्रशंसा मिळवत आहे. या चित्रपटाच्या यशा दरम्यान अपारशक्तीने स्पाय-थ्रिलरच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याची मुलगी अरझोईसह स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये अपारशक्ती ‘बर्लिन’ मधील त्याचे पात्र पुष्किन वर्माच्या पोशाखात दिसत असून तो आपल्या मुलीची काळजी घेताना दिसत आहे. दोघेही या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहेत.
अभिनेत्याने हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिले, “हा एक खास दिवसा जेव्हा अरझोईने पप्पांच्या कामावर येण्याचा निर्णय घेतला तेव्हा आई तिच्या इतर कामामध्ये व्यस्त होती. बर्लिन हा पहिला सेट होता जिथे अरझोईने माझ्यासोबत काम केले. हे थोड कठीण आहे आहे पण प्रामाणिकपणे, मी त्या दिवशी चांगली कामगिरी केली असा विचार करून माझी मुलगी मॉनिटरवर मला परफॉर्म करताना पाहत होती म्हणून हे शक्य झाले,” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील प्रतिसाद दिला आहे.
अभिनेता अपारशक्तीचे हे एक अविश्वसनीय वर्ष गेले आहे. ज्युबिली रिलीज झाल्यापासून अभिनेत्याच्या अष्टपैलुत्वाने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2023 च्या प्रकल्पाने अपारशक्तीच्या अभिनय पराक्रमाचा उत्सव साजरा केला जात आहे, जो ‘स्त्री 2’ द्वारे आणखी दृढ झाला. आणि ‘बर्लिन’ सह, अभिनेत्याने रिलीजच्या केवळ 3 दिवसांत 50 दशलक्ष वॉच मिनिटांची नोंद केली, अभिनेत्याने यापूर्वी कधीही न केलेली भूमिका साकारली आणि एक कलाकार म्हणून त्याची क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.
हे देखील वाचा- निकिता दत्ताच्या ‘घरत गणपती’ चित्रपटाने ऑस्कर 2024 च्या यादीत मिळवले स्थान!
आपल्या अभिनय कौशल्यासोबतच, अपारशक्तीने संगीत क्षेत्रातही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘कुडिये नी’ आणि ‘जरूर’ सारख्या त्याच्या हिट गाण्यांद्वारे, अपारशक्तीने त्याच्या अष्टपैलुत्वाचा संपूर्ण वैभव शोधून दाखवला आहे. शिवाय, त्यांच्याकडे ‘फाइंडिंग राम’ नावाची डॉक्युमेंटरीसुद्धा घेऊन येणार आहे. जो ऍप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित आहे. सध्या, तो ‘बदतमीज गिल’ साठी शूटिंग करत आहे जिथे तो वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. असे अनेक चित्रपट त्यांचे यावर्षी रिलीज होणार आहे.