
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ३८ वर्षांची आहे आणि तिचे लग्न कधी होणार हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती लेखक राहुल मोदीला डेट करत असल्याचे समजले आहे. अभिनेत्री अनेकदा त्याच्यासोबत एकत्र दिसली आहे. आता, अभिनेत्रीने अखेर त्यांच्या नात्याबद्दल एक संकेत चाहत्यांना दिला आहे. तिने एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने तिला विचारले की ती कधी लग्न करणार आहे? आणि अखेर श्रद्धाने या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना दिले आहे.
लग्नाबद्दल काय म्हणाली श्रद्धा?
ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनदरम्यान एका चाहत्याने श्रद्धा कपूरला विचारले, “तू लग्न कधी करणार आहेस? श्रद्धा कपूर जी.” यावर अभिनेत्रीने उत्तर दिले, “मी लग्न करेन, मी लवकरच लग्न करेल.” असे ती म्हणाली आहे. अभिनेत्री अनेक वर्षांपासून राहुल मोदीला डेट करत असल्याचे आधीच समजले आहे. परंतु या दोघांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही.
राहुल आणि श्रद्धा किती काळापासून डेटिंग करत आहेत?
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या अफवा २०२४ मध्ये पसरू लागल्या. हे दोघेही अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. त्याच वर्षी नंतर श्रद्धाने राहुलसोबतचा एक फोटो शेअर केला. नंतर अनेक वृत्तांतात असे म्हटले गेले की त्यांचे ब्रेकअप झाले आहे. परंतु, २०२५ मध्ये ते पुन्हा एकत्र दिसले. आणि त्यांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
श्रद्धाचे आगामी चित्रपट
श्रद्धेचे अनेक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ती मराठी तमाशा आणि लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या बायोपिक “ईथा” मध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे आणि या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मार्च २०२६ पर्यंत “ईथा” पूर्ण केल्यानंतर, ती “नागिन” चे शूटिंग सुरू करणार आहे. एका सूत्राने सांगितले की, “नागिनवर बऱ्याच काळापासून काम सुरू आहे. टीमला व्हीएफएक्स डिझाइनपासून ते कास्टिंगपर्यंत सर्वकाही परिपूर्ण करायचे होते. श्रद्धाच्या कास्टिंगला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर, उर्वरित कलाकारांनाही अंतिम रूप देण्यात आले आहे. एप्रिलपर्यंत शूटिंग सुरू करण्याचे नियोजन आहे.”