फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस १८ प्रोमो : टेलिव्हीजनवरचा चर्चित शो बिग बॉस १८ मधील सदस्य भरपूर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पहिल्या आठवड्यापासून घरामधील स्पर्धकांचे भांडण पाहायला मिळत आहेत. आजपासून बिग बॉस १८ चा चौथा आठवडा सुरु झाला आहे. शनिवार आणि रविवारच्या भागामध्ये विकेंडच्या वॉरमध्ये सलमान खानने अनेक स्पर्धकांना समजावले तर काहींना खडसावलं. यावेळी अनेकजण सलमान खानसमोर सुद्धा काही जणांनी वाद घातले आहेत. यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये चर्चेत असलेले करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये कडाक्याचे वाद पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यामध्ये सुद्धा या दोघांमध्ये मोठे वाद पाहायला मिळाले. आता कलर्सच्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये पुन्हा कडाक्याचा वाद झाल्याचे दिसत आहेत.
बिग बॉस 18 च्या घरामध्ये अविनाश आणि करणवीरमधील भांडण वाढत आहे. एका नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये दोघे पुन्हा एकदा समोरासमोर दिसू शकतात. खरंतर अविनाशने अप्रत्यक्षपणे करणवीरवर चोरीचा आरोप केला होता, ज्यानंतर करणला राग आला होता. मला जे पाहिजे ते मी समोरून घेतो, असे ते म्हणाले. जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा करणवीरने अविनाशला आव्हान दिले की जर कोणी त्याच्या वस्तूला हात लावण्याचा प्रयत्न केला तर तो हात उपटून फेकून देईल अशी धमकी त्याने दिली आहे.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : बिग बॉसने घरात ‘Time God’ चा डंका वाजवला! कोण होणार नवा कॅप्टन?
वास्तविक, हा सगळा वाद कॉफीच्या चोरीपासून सुरू झाला होता, ज्याबद्दल दोघांनाही माहिती नाही की ती कॉफी कोणी चोरली आहे. करणवीर व्यायाम करत असताना तेथून जाणाऱ्या अविनाशने करणवीरचे नाव न घेता हातवारे करत माझी कॉफी कोणीतरी चोरली असल्याचे सांगितले. करणवीरला लगेच समजले की ही बाब त्याला सांगितली नसली तरी अविनाश त्याच्याकडेच बोट दाखवत होता. करणवीरने उपरोधिकपणे उत्तर दिले, “मी समोरून घेणारा आहे, मला चोरी करण्याची गरज नाही.” यावर अविनाश म्हणाला की, अरे, चिडचिड का करतोस?
Karan ne indirectly di Avinash ko chetaavni. Kab mitegi inn dono ki dushmani? 🧐
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #BlueHeavenCosmetics #Harpic @mytridenthome… pic.twitter.com/4nGLcECtBj
— ColorsTV (@ColorsTV) October 28, 2024
पुढे करणवीर म्हणाला की, चोराच्या घरात कधी चोरी होत असते का? त्यानंतर अविनाशही फॉर्मात आला आणि त्याने करणवीरला उत्तर दिले. अविनाश म्हणाला- मी येऊन तुझा वॉर्डरोब उजवीकडे आणि डावीकडे हलवला तर ठीक होईल का? यानंतर करणवीर मेहरा आणखीनच नाराज झाला आणि म्हणाला, “जर कोणी माझ्या वैयक्तिक वस्तूंना हात लावताना दिसले तर मी त्याचा हात उपटून फेकून देईन.”