(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या खूप चर्चेत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या ‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोमध्ये तो दिसणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच, तो त्याची पत्नी नेहा स्वामीपासून घटस्फोट घेत असल्याचेही सांगितले जात आहे. आता या सर्व अटकळींवर टीव्ही अभिनेत्याने आपले मौन सोडले आहे. अर्जुन बिजलानीने एक व्हिडीओ शेअर करून संपूर्ण माहिती दिली आहे. तो व्हिडीओमध्ये काय म्हणाला आहे जाणून घेऊयात.
पत्नीसोबत शेअर केलेला व्हिडिओ
अर्जुन बिजलानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची पत्नी नेहा स्वामीसोबत एका सुंदर शैलीत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचेही अनेक फोटो दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मागील व्हिडिओमध्ये मी जे काही बोललो होतो, त्याचा काही अर्थ होता. पण मी अंदाज लावू नका असे म्हटले होते, म्हणून मी हे स्पष्ट करतो की मी बिग बॉसमध्ये येत नाही आणि घटस्फोट देखील घेत नाही आहे मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे.’ अभिनेता पुढे म्हणाला की तो सोमवारी यावर अपडेट देईल. आता पुन्हा नेटिझन्सच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
या अफवांना कशामुळे सुरुवात झाली?
अर्जुन बिजलानीबद्दलच्या या अफवांना सुरुवात झाली जेव्हा त्याने दोन दिवसांपूर्वी एक गूढ पोस्ट पोस्ट केली होती. त्यात तो म्हणाला होता की, ‘माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा काही घडते तेव्हा मी ते नेहमीच तुमच्यासोबत शेअर करतो. मला वाटले की मी ते तुमच्यासोबत शेअर करेन, कारण सध्या खूप काही सुरू आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझे कुटुंब माझ्यासाठी किती महत्वाचे आहे, विशेषतः माझी पत्नी आणि मुले. माझ्या चढ-उतारात ते नेहमीच माझ्यासोबत राहिले आहेत. पण, परिस्थितीमुळे, मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागला आणि मी कधीच विचार केला नव्हता की मी हे करेन.’ तेव्हापासून या अफवा सुरू झाल्या. तसेच आता अभिनेत्याने त्या सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे.
मोठे झुंबर, सोफा आणि बाल्कनी; रणबीर-आलियाचं 2,500,000,000 रुपयांचं पूर्ण झालं घर
‘बिग बॉस १९’ मध्ये दिसणार नाही अभिनेता
सलमान खानने होस्ट केलेला ‘बिग बॉस १९’ हा शो आज २४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. सर्व स्पर्धकांची नावे आज जाहीर केली जातील. तसेच, अर्जुन बिजलानीने शोमध्ये सामील होण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.