(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने त्याच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या चित्रपटाच्या प्रीमियरचे आयोजन केले होते, ज्यामध्ये माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, काजोल, फराह खान, करण जोहर आणि इतर अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.तरसोशल मीडियावर सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा फोटो म्हणजे आर्यन त्याच्या शाळेतील मित्रांसह आहे. आर्यन खानचा ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ 18 सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्याला कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान आर्यन खानचे बॉलीवूड पदार्पणासाठी अनेकांनी त्याचे कौतुक देखील केले आहे.
प्रीमियरमध्ये आर्यन त्याच्या सर्व शाळेतील मित्रांसोबत पोज देत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोसोबतच एक जुना फोटो देखील व्हायरल होत आहे. एक फोटो हा आर्यनच्या वर्ग मित्रांसोबतचा शाळेतील फोटो आहे तर दुसऱ्या आर्यन खानच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या चित्रपटाच्या प्रीमियरचा आहे.आर्यननेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हा फोटो पुन्हा पोस्ट केला आहे. यामुळे सोशल मीडियावर चाहते आर्यनचे कौतुक देखील करत आहेत.
Aryan Khan had invited his school friends in #TheBadsOfBollywood premeire ❤️ pic.twitter.com/3ZbgugNgap
— 👸Sharania Jhanvi𓀠 (@SharaniaJ) September 18, 2025
या व्हायरल झालेल्या फोटोवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आर्यनने केलेल्या या पोस्टमुळे अनेकांची मनं आर्यन ने जिंकली आहे. एका चाहत्याने लिहिलं,”काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. आर्यन खानने आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या #TheBadsOfBollywood च्या प्रीमियरला शाळेतील मित्रांना आमंत्रित केलं.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं, ”अरे, किती गोड आहे हे! वाटतंय तो खरोखरच संस्कारी मुलगा आहे.” अश्या प्रकारे चाहत्यांनी आर्यन खानचे कौतुक करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
Aryan Khan Invited His School Friends For Bads Of Bollywood Premier 💖
Oh That’s So Sweet 😊
Looks Like He is A Boy With Manners 💖 pic.twitter.com/wJDvDPS2Nf
— POSITIVE FAN (@imashishsrrk) September 19, 2025