Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऍटलीच्या जवान चित्रपटाला एक वर्ष पूर्ण, शारुखच्या ॲक्शन चित्रपटाच्या रेकॉर्डब्रेक कामगिरीवर टाका एक नजर!

बॉलीवूड स्टार शाहरुख खान, नयनतारा, दीपिका पदुकोण आणि विजय सेतुपती अभिनीत ब्लॉकबस्टर चित्रपट निर्माते ऍटली दिग्दर्शित जवान चित्रपटाने एक वर्ष पूर्ण केले आहे, तरीही भारतीय चित्रपटसृष्टीवर या चित्रपटाचा प्रभाव आजही तितकाच जबरदस्त आहे. या हाय-ऑक्टेन ॲक्शन एंटरटेनरने केवळ शाहरुख खानला नवीन उंचीवर नेले नाही तर बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 09, 2024 | 05:32 PM
(फोटो सौजन्य- Social media)

(फोटो सौजन्य- Social media)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी कामगिरी ‘जवान’ चित्रपटामध्ये केली आहे. चाहत्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. या चित्रपटामध्ये मास-मार्केट अपीलसाठी ओळखल्या जाणाऱ्या ॲटलीने शाहरुखला दुहेरी भूमिकेत दाखवले आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेली भूमिका शाहरुखचा नवा अवतार चाहत्यांना या चित्रपटाद्वारे पाहायला मिळाला. या चित्रपटामधील शाहरुखचे उत्कृष्ट अभिनय कौशल्य त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मानला जात आहे.

ऍटलीच्या दिग्दर्शनाच्या प्रतिभेने जागतिक स्तरावर ठसा उमटवला, महाकाव्य सिनेमॅटिक अनुभवांचे मास्टर म्हणून या निर्मात्याने आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. आकर्षक कथेसह ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपट देण्याची त्याची क्षमता दाखवते की तो मनोरंजनाच्या क्षेत्रात का अतुलनीय आहे. जवानने बॉलीवूडमध्ये संपूर्ण भारताचे आकर्षण आणण्याची आपली अनोखी क्षमता दाखवली, हृदयस्पर्शी कथेसह नेत्रदीपक ॲक्शन सीक्वेन्ससह चाहत्यांना या चित्रपटाची अनोखी झलक पाहायला मिळाली.

जवान या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले, विशेषत: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. जगभरात 1,148.32 कोटी रुपयांची प्रभावी कमाई करणारा हा पहिला चित्रपट आहे. तसेच 2023 चा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. भारतात, जवानने ₹600 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट बनून इतिहास रचला आहे. ₹200 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा हा सर्वात जलद बॉलीवूड चित्रपट आहे, ज्याने अवघ्या तीन दिवसांत ₹300 कोटी आणि केवळ पाच दिवसांत ₹300 कोटी कमावलेया आहे.

बॉक्स ऑफिसच्या पलीकडे, जवानला चाहते आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याला अनेक नामांकने आणि पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटाचे ॲक्शन सीक्वेन्स, स्टार-स्टडेड कास्ट आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केलेल्या साउंडट्रॅकने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अखिल भारतीय चित्रपट बनवला आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीत कायमस्वरूपी वारसा ठरला आहे.

हे देखील वाचा- जन्माला येताच दीपिकाची लेक झाली कोट्यवधींची मालकीण, रणवीरपेक्षा आहे दुप्पट संपत्ती!

जवान चित्रपटाला आज रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु रेकॉर्ड-सेटिंग, इंडस्ट्री-परिभाषित ॲक्शन एन्टरटेनर म्हणून त्याचा वारसा मजबूत आहे, ऍटलीच्या अद्वितीय दृष्टीचा आणि शाहरुख खानच्या करिश्माई स्क्रीन उपस्थितीचा हा चित्रपट पुरावा आहे.

Web Title: Atlee kumar directed shah rukh khan starrer movie jawan completed 1 year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 05:32 PM

Topics:  

  • shahrukh khan

संबंधित बातम्या

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त
1

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.