(फोटो सौजन्य- Social media)
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. जन्माला येताचं दीपीका आणि रणवीरची मुलगी 775 कोटींची मालकीण झाली आहे. दीपीकाची संपत्ती ही रणवीरच्या संपत्तीपेक्षा दुप्पट आहे.
शुक्रवारी रणवीर आणि दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शनदेखील घेतले होते. व्हायरल बिर्याणी या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर ‘इट्स अ गर्ल’ असं लिहिण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दीपिकाला तिच्या आईबरोबर नेण्यात आले होते. दीपिका आणि रणवीरने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या दोघांवरही शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
2018 मध्ये दीपिका आणि रणवीरने इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग मोठ्या थाटामाटात साजरे केले होते. जवळचे मित्र-मैत्रिण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा हा शाही लग्न सोहळा पार पडला होता. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरुमध्ये या जोडप्यानी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. फेब्रुवारी महिन्यात दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आई वडिल होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. गेल्या आठवड्यातच दीपिकाने मॅटरनिटी फोटोशूट केले होते. मॅटरनिटीच्या बोल्ड फोटोशूटमुळे दीपीकाला ट्रोल देखील करण्यात आले होते.
हे देखील वाचा- सोनी बीबीसी अर्थवरील ‘अर्थ इन फोकस’ने फोटोग्राफी प्रेमींसाठी ‘वन वर्ल्ड, मेनी फ्रेम्स’ केले लाँच!
दीपिका आहे रणवीरपेक्षा दुप्पट श्रीमंत
दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे टॉप स्टार आहेत. चित्रपट आणि जाहिरातींसाठी ते कोट्यावधीचे मानधन घेतात. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, रणवीर कपूरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूडमधील टॉप आणि महागडी अभिनेत्री अशी दीपीकाची ओळख आहे. दीपिकाची एका महिन्याची कमाई 3 कोटींपेक्षा जास्त आहे. दीपिकाने अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि फॅशन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. बॉलिवूडमधील श्रीमंत स्टार्स म्हणून ओळखली जाते. कमाईच्या बाबतीत दीपिका आणि रणवीर एकमेकांना इथे टक्कर देत आहेत. या दोघांची संयुक्त संपत्ती 745 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याचदरम्यान आता दीपिकाच बाळ आता या सगळ्या संपत्तीचा हिस्सा बनणार आहे. जन्माला येताचं दीपीकाची मुलगी 775 कोटींची मालकिण झाली आहे.