(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बाबिल खानच्या टीमने त्याच्या अलीकडील व्हायरल व्हिडिओ आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हे विधान अभिनेत्याची आई सुतापा यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘गेल्या काही वर्षांत बाबिलला त्याच्या अभिनयाबद्दल आणि त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल उघडपाने सांगितल्यानंतर त्याला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीप्रमाणे, बाबिलसाठीही काही दिवस कठीण असू शकतात. बाबिललाही कठीण दिवसांमधून जावे लागत आहे आणि हे त्यापैकीच एक आहे. आम्ही त्याच्या सर्व हितचिंतकांना खात्री देऊ इच्छितो की बाबिल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि लवकरच बरा होत आहे’. असं विधान अभिनेत्याच्या टीमेने जारी केले आहे.
आमिर खान लवकरच घेऊन येणार Sitaare Zameen Par चा ट्रेलर? शेअर केलेल्या पोस्टने उडाली खळबळ
व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावण्यात आला
व्हायरल व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ बाहेर पडत आहे, असेही टीमने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये बाबिलने अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव, अर्जुन कपूर आणि अरिजित सिंग या कलाकारांचा उल्लेख केला आहे. बाबिलने या स्टार्सचे कौतुक केले कारण त्यांना वाटते की हे लोक भारतीय चित्रपटसृष्टीला अधिक चांगले बनवण्यात खरे योगदान देत आहेत. त्यांच्या शब्दात या कलाकारांच्या उत्कटतेबद्दल आणि सत्याबद्दल आदर आहे. टीमने माध्यमांना आणि लोकांना व्हिडिओचे छोटे भाग पाहून घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत, तर बाबिलच्या शब्दांचा संपूर्ण संदर्भ समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
संपूर्ण प्रकरण काय आहे?
खरंतर, अलीकडेच बाबिल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याबद्दल असा दावा केला जात होता की बाबिलने स्वतः तो सकाळी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता आणि नंतर तो डिलीट केला होता. या व्हिडिओमध्ये बाबिलने अनन्या पांडे आणि अर्जुन कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकारांना बनावट म्हटले होते, असा दावा करण्यात आला होता.
Haseen Dillruba 3 बाबत समोर आली मोठी बातमी, प्रेक्षकांना पाहायला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त सस्पेन्स!
इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, बाबिलने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले, ज्यामुळे वाद आणखी वाढला. त्याच वेळी, सोशल मीडियावर काही चाहत्यांनी बाबिल खानला पाठिंबा दिला असताना, काही वापरकर्त्यांनी त्याला ट्रोलही केले. आता, बाबिलच्या चाहत्यांनी त्याच्या टीमच्या विधानाचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी लिहिले की बाबिल नेहमीच त्याच्या सत्याबद्दल आणि मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलला आहे आणि यावेळीही त्याचे शब्द चुकीचे समजले गेले. दुसरीकडे, या प्रकरणावर अद्याप अनन्या पांडे, अर्जुन कपूर किंवा इतर स्टार्सकडून कोणतेही विधान आलेले नाही.