(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांच्या ‘हसीन दिलरुबा’ या थ्रिलर मिस्ट्री चित्रपटाबद्दल येणारी बातमी वाचून चाहत्यांमधील उत्साह नक्कीच वाढणार आहे. ‘हसीन दिलरुबा’चे दोन्ही भाग चाहत्यांना खूप आवडले आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘हसीन दिलरुबा’चा सिक्वेलही लवकरच येण्याची शकता आहे. आता ‘हसीन दिलरुबा ३’ बद्दल एक खास अपडेट समोर आली आहे. तापसी पन्नू आणि कनिका ढिल्लन यांनी अलीकडेच हसीन दिलरुबा फ्रँचायझीबद्दल एक इशारा दिला आहे.
१९ वर्षीय प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्रीने केली आत्महत्या, बंद खोलीत आढळली वाईट अवस्थेत !
‘हसीन दिलरुबा’च्या सिक्वेलची तयारी जोरात सुरू
आता ‘हसीन दिलरुबा ३’ च्या पटकथेवर काम सुरू असल्याची पुष्टी झाली आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ‘हसीन दिलरुबा’च्या तिसऱ्या भागाची तयारी जोरात सुरू आहे. टीमने राणी आणि ऋषू यांच्या प्रेमकथेतील आणखी एका भागाबद्दल माहिती प्रेक्षकांना दिली आहे आता लवकरच या मालिकेचा सिक्वेल येणार आहे. आता असे म्हटले जात आहे की ‘हसीन दिलरुबा ३’ मागील दोन भागांपेक्षा अधिक मनोरंजक असणार आहे. हा सिक्वेल आधीपेक्षा आणखी भव्य असणार आहे.
यावेळी मालिकेत अधिक रहस्य आणि रोमांचक पाहायला मिळेल
‘हसीन दिलरुबा’ हा प्लॅटफॉर्मवरील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत, ते पूर्वीपेक्षा अधिक मजेदार, रहस्यमय आणि रोमांचक बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या, ही मालिका कधी प्रदर्शित होऊ शकते याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या चित्रपटाच्या पटकथेवर निर्माते काम करत आहे.
‘सब बिका हुआ है…’ गायक मिका सिंगने बॉलिवूड पुरस्कार सोहळ्याचा केला पर्दाफाश!
नेटफ्लिक्सवर मिळाले भरपूर यश
‘हसीन दिलरुबा’चा पहिला भाग २०२१ मध्ये आला होता. हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रभावित करण्यात आणि त्यांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली. यानंतर 2024 मध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीचा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा सिक्वेल आला. या भागात या दोघांसोबत सनी कौशलनेही मुख्य भूमिका साकारली होती. तसेच आता तिसऱ्या भागात नक्की काय कथा असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.