
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
विनोदी अभिनेत्री भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने पुन्हा एकदा गोड मुलाला जन्म दिला आहे, अभिनेत्रीच्या बाळाला जन्मानंतर लगेचच वैद्यकीय तपासणीसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आता, दोन दिवसांनी भारतीने त्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. तिने पहिल्यांदाच काजूला हातात धरले, ज्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेले दिसून आले आहे. तिने तिच्या नवीन YouTube व्लॉगमध्ये त्याची तिच्या चाहत्यांना ओळख करून दिली. परंतु, तिने अद्याप त्याचा चेहरा दाखवलेला नाही.
भारती सिंग व्हिडिओमध्ये म्हणाली, “किती गोंडस! काजू अखेर माझ्या हातात आहे. तो एक सुंदर आणि निरोगी बाळ आहे, गोल्यासारखा. लवकरच आम्ही तुम्हाला त्याचा चेहरा दाखवू. शेवटी, माझा काजू माझ्या हातात आहे. दोन दिवसांनी मी माझ्या बाळाला हातात घेतल आहे. बाळ आनंदी आणि निरोगी आहे.” असे भारतीने म्हटले.
यापूर्वी, सेलिब्रिटी कुकिंग रिॲलिटी शो “लाफ्टर शेफ सीझन ३” चे चित्रीकरण करताना भारतीच्या पोटातील पिशवी फुटल्याचे समोर आले होते आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, भारतीने नंतर स्पष्ट केले की ती तिच्या मुंबईतील घरी होती तेव्हा संध्याकाळी ६ वाजता तिच्या पोटाची पिशवी फुटली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ती तिचा पती हर्ष, कुटुंबातील इतर सदस्य आणि मुलगा लक्ष्य (प्रेमाने गोला) यांच्यासोबत प्रसूतीसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेले.
Murder Mystery: नेटफ्लिक्सच्या नव्या चित्रपटाने केलाय कल्ला, विचारात पाडणारा Climax
भारती आणि हर्ष यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर, ३ डिसेंबर २०१७ रोजी गोव्यात एका भव्य ठिकाणी लग्न केले. त्यांचा पहिला मुलगा लक्ष म्हणजेच गोलाचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला. आता, तीन वर्षांनंतर, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. आणि ते कुटुंब आनंदाच्या वातावरणात आहेत. तसेच भारतीने सांगितल्या प्रमाणे ती लवकरच तिच्या काजूचा चेहरा चाहत्यांसमोर दाखवणार आहे.