(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अमृता खानविलकरने साड्यांचा व्यवसाय सुरू केला असून त्याच्या ब्रँडचं नाव अतिशय खास आणि भावनिक आहे. हा व्यवसाय केवळ फॅशनपुरता मर्यादित नसून, तिच्या मनातून आणि संस्कृतीप्रेमातून जन्माला आलेला असल्याचं अमृताने सांगितलं आहे. अमृताने तिच्या नव्याकोऱ्या साड्यांच्या ब्रँडला ‘अमुल्य बाय अमृता’ असं नाव दिलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते, “माझ्या मनातून तुमच्यापर्यंत…काहीतरी अमूल्य येत आहे”अभिनयासोबत आता बिझनेसवुमन म्हणून अमृताची नवी ओळख तयार होत असून, तिच्या या नव्या प्रवासाला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अभिनेत्रीने तिच्या यंदाच्या बर्थ डे स्पेशल पोस्टमध्ये अमुल्य बाय अमृताची घोषणा केली होती. अमृता म्हणालेली, मनात एक नवीन ऊर्जा, नवीन स्वप्न आणि तुमच्या सर्वांचं प्रेम सोबतीला घेऊन नव्या वर्षात मी एक नवा प्रवास सुरू करत आहे. जानेवारी २०२६ मध्ये माझ्या मनाच्या अगदी जवळची एक खास गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे. खूप वैयक्तिक… खूप खास… आणि अगदी माझ्यासारखी ज्याचं नाव आहे अमुल्य बाय अमृता!”
सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कलाकार मंजिरी ओक, मधुगंधा कुलकर्णी, आशीष पाटील, स्वप्नील जोशी, सई गोडबोले, सोनाली खरे यांनी अमृताला तिच्या नव्या व्यवसाय प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांसह सहकाऱ्यांकडून मिळालेली ही प्रोत्साहनात्मक प्रतिक्रिया अमृतासाठी प्रेरणादायी ठरत आहे.






